ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली, पण नफ्यातील वाटयासाठी सहनिर्मात्यांमध्ये कॅटफाईट - Ranbir kapoor

Animal movie controversy: अभिनेता रणबीर कपूर अभिनीत 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या सहनिर्मात्यांमध्ये ओटीटी रिलीवरुन वाद निर्माण झाला आहे. टी सिरीज आणि सिने 1 स्टुडिओ यांच्यातील भांडण आता न्यायालयापर्यंत पोहोचले आहे.

Animal Movie  OTT Release date
अ‍ॅनिमल चित्रपट ओटीटी रिलीज तारीख
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 10:59 AM IST

Updated : Jan 16, 2024, 5:35 PM IST

मुंबई - Animal movie controversy : अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 47 दिवस झाले आहेत. 47 दिवस पूर्ण होऊनही, 'अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करताना दिसत आहे. आता काहीजण या चित्रपटाची ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. दरम्यान 'अ‍ॅनिमल'च्या ओटीटी रिलीजबाबत खुलासा झाला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपट नेटफ्लिक्सवर 26 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते सिने 1 स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे.

दोन प्रॉडक्शन हाऊसमध्ये झाला वाद : न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठाने याचिकेशी संबंधित काही स्पष्टीकरणांसाठी 18 जानेवारीला पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. सिने 1 स्टुडिओनं सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी-सीरीज) विरोधात याचिका दाखल केली आहे. दोन प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या निर्मितीसाठी करार केला होता. याचिकेतील, या करारानुसार, सिने 1 स्टुडिओला 35 टक्के नफ्याचा वाटा द्यायचा होता. या याचिकेत आरोप करण्यात आला आहे की टी-सीरीज ने सिने 1 स्टुडिओकडून बॉक्स ऑफिस विक्रीबाबत कोणताही तपशील शेअर न करता नफा कमावला आणि या नफ्यातून त्यांनी कोणतेही पैसे दिले नाहीत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाब्दल वाद : सुनावणीदरम्यान, टी-सीरीजचे वकील अमित सिब्बल यांनी सांगितले की, 2 ऑगस्ट 2022 रोजी मूळ करारामध्ये सुधारणा करण्यात आली होती, ज्या अंतर्गत सिने 1 स्टुडिओने आपले सर्व हक्क टी-सीरीजला 2 कोटी रुपयांना विकले होते. या करारमध्ये त्यांनी साठ लाख दिले. अमित सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने सिने 1 स्टुडिओचे वकील संदीप सेठी यांच्याकडून सूचना घेऊन 18 जानेवारीला न्यायालयाला कळवण्याचे निर्देश दिले आहेत.

अ‍ॅनिमल' कलेक्शन : 'अ‍ॅनिमल'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या चित्रपटानं आतापर्यंत भारतात एकूण 550.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील या चित्रपटानं 900 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. देशांतर्गत या 'अ‍ॅनिमल'नं 550.85 कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर कमाई केला आहे. रणबीर कपूरचा हा पहिला चित्रपट, ज्यानं इतकी कमाई केली.

'अ‍ॅनिमल'मध्ये बॉबीचा नवीन अवतार : या चित्रपटामध्ये रणबीर कपूरनं रणविजय सिंगची भूमिका साकारली आहे. बॉबी देओल अब्राह हक नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. रश्मिका मंदान्ना या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीच्या भूमिकेत आहे. 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत अनिल कपूर आहे. या चित्रपटात त्याचं नाव बलबिर सिंग असून अनिल कपूरचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. या चित्रपट रणबीर अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे.

हेही वाचा :

  1. मराठी राजकीय चित्रपट 'लोकशाही'चे पोस्टर झालं रिलीज
  2. अमिताभ बच्चन यांनी घर बांधण्यासाठी अयोध्येत खरेदी केली जमीन; किंमत जाणून बसेल धक्का
  3. दीपिका स्टारर 'फायटर'चा ट्रेलर रिलीज, पुलवामासह बालाकोटचाही आहे उल्लेख

Last Updated : Jan 16, 2024, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.