ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांची ब्लॉकबस्टर ऑफर , 'इतक्या' पैशात पाहू शकाल चित्रपट - अ‍ॅनिमलची तिकिट 100 रुपये

Animal Blockbuster Offer On Ticket : 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी आता चित्रपटाच्या तिकीट दरात सवलत द्यायचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Animal Blockbuster Offer On Ticket
अ‍ॅनिमल तिकिटावर ब्लॉकबस्टर ऑफर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 12:19 PM IST

Updated : Jan 9, 2024, 1:13 PM IST

मुंबई - Animal Blockbuster Offer On Ticket : 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर सुरू आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं एक महिन्याहून अधिक काळ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ केला. 'अ‍ॅनिमल'नं देशांतर्गत आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली असून या चित्रपटाचा व्यवसाय अजूनही सुरू आहे. दरम्यान हा 'अ‍ॅनिमल' चित्रपट बघायचा असेल तर, चित्रपट निर्मात्यानं 'अ‍ॅनिमल'ची ब्लॉकबस्टर ऑफर दिली आहे. अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती दिमरी स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपट थिएटरमध्ये बघायचा असे तर आता फक्त 100 रुपये खर्च करावे लागतील.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं तिकीट 100 रुपये : आतापर्यंत 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं तिकीट 300 रुपयांना मिळत होतं. परंतु आता हे तिकिट 100 रुपयांचं करण्यात आलं आहे. 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ''आता फक्त 100 रुपयांमध्ये तुमचा आवडता चित्रपट पाहा.'' या पोस्टला अनेकजण लाईक करत आहेत. नुकतीच 'अ‍ॅनिमल'ची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. याशिवाय पार्टीत आलिया भट्ट, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांनी आपल्या सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची सक्सेस पार्टी : 'अ‍ॅनिमल'च्या सक्सेस पार्टीत रणबीर कपूरबरोबर त्याची आई नीतू कपूर आणि सासरे महेश भट्ट देखील दिसले. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा चित्रपट रणबीरच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट ठरला. या चिपटामध्ये रणबीर हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला आहे. 'अ‍ॅनिमल'नं आतापर्यंत देशांतर्गत 550.85 कोटी रुपये आणि जगभरात 900 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे. हा चित्रपट 1000 कोटी बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकतो, अशी अपेक्षा चित्रपट निर्माते करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'सनफ्लॉवर 2'मध्ये सुनील ग्रोव्हरसोबत झळकणार 'द केरल स्टोरी' फेम अदा शर्मा
  2. बिग बॉसच्या घरात अभिषेक कुमारची रिएनट्री, कृतघ्न असल्याची स्पर्धकांकडून टीका
  3. 'सालार' सक्सेस पार्टीत प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत कापला केक

Last Updated : Jan 9, 2024, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.