ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पाचव्या दिवशी करणार 'इतकी' कमाई - बॉक्स ऑफिस

Animal and Sam Bahadur collection day 5 : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' आणि विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षक खूप पसंत करत आहेत.

Animal and Sam Bahadur collection day 5
'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' कलेक्शन दिवस 5
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 1:13 PM IST

मुंबई - Animal and Sam Bahadur collection day 5 : रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' आणि विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हे चित्रपट 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाले. रणबीरचा 'अ‍ॅनिमल' हा चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. या चित्रपटानं 3 दिवसात रुपेरी पडद्यावर 200 कोटीहून अधिक कमाई केली. 'अ‍ॅनिमल'नं अनेक चित्रपटाचे विक्रम मोडले आहेत. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त बॉबी देओल, तृप्ती डिमरी, अनिल कपूर, शक्ती कपूर आणि इतर कलाकार आहेत. दुसरीकडे 'सॅम बहादुर' चित्रपटामध्ये विकी कौशलसोबत सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, मोहम्मद झीशान अय्युब आणि इतर कलाकार आहेत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं कलेक्शन : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल'नं 'रिलीजच्या पहिल्या सोमवारी 'जवान', 'पठाण' आणि 'गदर 2'ला मागे टाकले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'अ‍ॅनिमल'नं पहिल्या दिवशी 63.8 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी 66.27 कमवले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 71.46 कोटीचा गल्ला जमवला आहे. यानंतर या चित्रपटानं चौथ्या दिवशी 39.9 कोटीची कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 241.43 कोटी झालं आहे. हा चित्रपट आता रिलीजच्या पाचव्या दिवसात आहे. हा चित्रपट आज रुपेरी पडद्यावर 4.41 कोटी कमाई करू शकतो. यानंतर या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 245.84 होईल.

'सॅम बहादूर' चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'सॅम बहादुर'नं पहिल्या दिवशी 6.25 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 9 कोटींचा गल्ला जमवला. यानंतर या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 10.3 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी 3.50 कोटीचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे 29.05 कोटींवर पोहोचलं आहे. हा चित्रपट रिलीजच्या पाचव्या दिवशी 46 लाखाची कमाई करू शकतो. 'सॅम बहादूर' या चित्रपटामध्ये विकी कौशलनं सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट रुपेरी पडद्यार येणाऱ्या दिवसात किती कमाई करेल हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. राखी सावंतनं अब्रुनुकसानीचा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात घेतली धाव
  2. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा बहप्रतीक्षित 'डंकी'चा ट्रेलर रिलीज
  3. सीआयडीचा फ्रेड्रिक गेला, अभिनेता दिनेश फडणीस यांचं निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.