ETV Bharat / entertainment

'फायटर' चित्रपटामधील अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज ; पाहा पोस्टर - फर्स्ट लुक रिलीज

Fighter Anil kapoor : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणनंतर आता अनिल कपूरचा 'फायटर' चित्रपटामधील फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात अनिल कपूर हा कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Fighter Anil kapoor
फायटर अनिल कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 2:17 PM IST

मुंबई - Fighter Anil kapoor : अनिल कपूर , हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी 'फाइटर' चित्रपटात हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनिल कपूरचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये अनिल कपूरचा दमदार अवतार पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा 'मिस्टर इंडिया' हा त्याच्या नुकत्याच आलेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळं चर्चेत आहे. या चित्रपटात तो रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिका साकारत आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. 'फायटर'मध्ये अनिल कपूर हा ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंह ही भूमिका साकारत आहे.

अनिल कपूरचं फर्स्ट लुक : 'फाइटर' चित्रपटामधील फर्स्ट लूकमध्ये अनिल कपूर हा पायलटच्या गणवेशात दिसत आहे. अनिल कपूरला हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या फिटनेससाठी ओळखलं जातं. अनिल कपूरनेही या चित्रपटामधील त्याच्या फर्स्ट लूकचं पोस्टर चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''सर तुम्हाला या चित्रपटासाठी शुभेच्छा' दुसऱ्या एकानं लिहिलं, तुम्ही खूप सुंदर अभिनय करता, हा चित्रपट नक्की हिट होईल''. याशिवाय आणखी एकानं लिहिल, ''खरा 'जवान' तर हा आहे'' अशा अनेक कमेंट या पोस्टरवर येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

'फाइटर'ची रिलीज डेट : 'फायटर' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 (Viacom18 Studios) आणि मर्फ्लिक्स पिक्चर ( Marflix Pictures) यांनी केली आहे. हा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो करण जोहरच्या 'तख्त' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल, रणवीर सिंग ,आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, करीना कपूर खान आणि जान्हवी कपूर हे कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर 'द आर्चीज' स्क्रिनिंगमध्ये एकत्र
  2. 'द आर्चीज' प्रीमियरमध्ये जया बच्चन पापाराझीवर भडकली, ट्रोलर्सना दिलं आमंत्रण
  3. ममता बॅनर्जींनी केला सलमान खानसोबत डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पण एकदा पाहाच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.