मुंबई - बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन 2 साठी समीक्षक बनला. चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पाहिल्यानंतर, अनिलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिग्दर्शकासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
अनिल कपूरने केले पोन्नियिन सेल्वन 2चे समीक्षण - त्याने लिहिले, 'मणिरत्नमचा PS2 पाहणे हा एक आनंददायी अनुभव होता! आकर्षक नाट्य, मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि महाकाव्य स्केलने मला सुरुवातीपासूनच वेड लावले होते! खऱ्या खुऱ्या छंया विक्रमला पाहणे अलौकिक होते. ऐश्वर्या राय कठीण भूमिकेतही अत्यंत ब्रलियंट वावरली आहे. एआर रहमान यांच्या संगीताने चित्रपटाला एका महाकाव्य पातळीवर नेऊन टाकले आहे आणि माझा मित्र वर्मन याच्या वेशभूषेने बाजी मारली आहे. मला #PS2 चा भाग होण्याचा बहुमान आणि सन्मान वाटतो... मणिरत्नम यांचे आणि भारतीय सिनेमाला एक वास्तविक रत्न भेट देण्यासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन !'
मणिरत्नमच्या PS2 ची जगभर चर्चा - 'पोन्नियिन सेल्वन 2' हा 2022 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अभिनेता कमल हासनने चित्रपटाच्या कथनाला आपला आवाज दिला आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. 'पोन्नियिन सेल्वन 1', पीरियड सागाने जगभरात बॉक्स ऑफिसवर आधीच 150 कोटी रुपयांची कमाई केली होती. अभिनेता विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, पार्थिबन आणि विक्रम प्रभू या चोल राजवंशातील महाकाव्य चित्रपटाच्या दुसर्या भागात त्यांच्या भूमिका पुन्हा सादर करतात.
कल्की कृष्णमूर्तीच्या यांच्या गाजलेल्या कादबंरीवर आधारित चित्रपट - हा चित्रपट कल्की कृष्णमूर्तीच्या त्याच नावाच्या पाच भागांच्या कादंबरी मालिकेचे रूपांतर आहे. पोन्नियिन सेल्वन भाग 1 मध्ये कादंबरी मालिकेचा एक तृतीयांश भाग समाविष्ट झाला आहे आणि उर्वरित भाग दुसऱ्या भागात सांगण्यात आला आहे. पहिला भाग ज्यांनी पाहिला आहे ते प्रेक्षक खूप दिवसापासून या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
हेही वाचा - Sanjay Dutt Remembers Mother : संजय दत्तने आई नर्गिसच्या पुण्यतिथीनिमित्त थ्रोबॅक फोटोसह लिहिली भावूक पोस्ट