ETV Bharat / entertainment

Anil Kapoor Birthday Special : उत्कृष्ट अभिनयानं अनिल कपूरनं जिंकली प्रेक्षकांची मने - अनिल कपूरचे आगामी चित्रपट

Anil Kapoor birthday special : अभिनेता अनिल कपूर आज 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. चार दशकापासून अनिल अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे.

Anil Kapoor birthday special
अनिल कपूरचा वाढदिवस स्पेशल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 5:28 PM IST

मुंबई - Anil Kapoor birthday special : ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर आज 24 डिसेंबर रोजी आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्कृष्ट अभिनयानं अनिलनं सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिली आहेत. चार दशकांच्या कारकिर्दीत अनिलनं फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अनिल कपूरनं वेब सीरिजमध्येही आपली छाप सोडत आहे. अनिल कपूरच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल आपण जाणून घेऊया.

अनिल कपूरचे चित्रपट : अनिल कपूरनं 'हमारे तुम्हारे' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट 1979 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर त्यानं 'तेजाब' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली. 'तेजाब' चित्रपटानंतर त्याला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या. 1987 रोजी रिलीज झालेला त्याचा 'मिस्टर इंडिया' हा खूप गाजला. अनिल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता बनला. त्यानं आपल्या करिअरमध्ये 'स्लमडॉग मिलेनियर', 'वेलकम', 'नायक', 'परिंदा', 'राम लखन', 'पुकार',' किशन कन्हैया', 'नो एंट्री', 'दिल धडकने दो', 'ताल' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहेत.

अनिल कपूरचे आगामी चित्रपट : अनिल कपूरनं 'द नाईट मॅनेजर' वेब सीरीजमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसला आहे. या वेब सीरीजमध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. ही वेब सीरीज खूप लोकप्रिय झाली आहे. अनिल कपूर वयाच्या 67 व्या वर्षीही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अलीकडेच अनिल कपूर रणबीर कपूरसोबत 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात दिसला होता. याआधी त्यानं एकता कपूरच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटातही खास भूमिका साकारली होती. दरम्यान अनिल कपूर आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर , तो हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत 'फायटर' या चित्रपटात एरियल अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या पुढं तो 'साढे साती' आणि 'तख्त' या चित्रपटामध्ये दिसेल.

हेही वाचा :

  1. उमंग 2023: मुंबई पोलिसांच्या उमंग कार्यक्रमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जबरदस्त एंट्री, पाहा व्हिडिओ
  2. मुंबई पोलिसांच्या वार्षिक कार्यक्रमात 'या' कलाकारांनी लावली हजेरी
  3. शाहरुख खान स्टारर 'डंकी' करणार बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी 'इतकी' कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.