ETV Bharat / entertainment

An action hero Ayushmann : अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो आयुष्मानचे चाहत्याला सडेतोड उत्तर, म्हणाला मीही शाहरुखचा जबरा फॅन - आयुष्मान खुराणा

आयुष्मान खुराणाच्या चाहत्याने पठाण पेक्षा अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आयुष्मानने चाहत्याला शांत बसायला सांगत, आपणही शाहरुखचे फॅन असल्याचे सांगितले.

Etv Bharat
अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो आयुष्मान
author img

By

Published : Feb 4, 2023, 9:57 AM IST

Updated : Feb 4, 2023, 10:30 AM IST

मुंबई - शाहरुख खानचा पठाण चित्रपट जगभर गाजत असताना त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे थंड पडले आहेत. असे असले तरी काही जण पठाणवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच आयुष्मान खुराणाचा अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय आणि आयुष्मानच्या चाहत्यांना तो आवडला आहे, याबद्दल कोणतीच शंका असण्याचे कारण नाही. परंतु एका चाहत्याने पठाण पेक्षा अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आयुष्मानने चाहत्याला शांत बसायला सांगत, आपणही शाहरुखचे फॅन असल्याचे सांगितले.

  • Screw Pathan, watch Action Hero on Netflix! Story, dialogues, background music, the subtle middle finger shown to Indian news channels and their crass reporting, @ayushmannk has KILLED it! But my fav was the guy mimicking Arnab

    — Mubina Kapasi (@MubinaKapasi) February 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयुष्मानची चाहती असेल्या मुबिना कापसीने ट्विट करत लिहिले की, 'स्क्रू पठाण, नेटफ्लिक्सवर अ‍ॅक्शन हिरो पहा! कथा, संवाद, पार्श्वसंगीत, भारतीय वृत्तवाहिन्यांना दाखवले जाणारे सूक्ष्म मधले बोट आणि त्यांचे चुकीचे रिपोर्टिंग, आयुष्मानने तर जबरदस्त मारले आहे. ! पण अर्णबची नक्कल करणारा माणूस माझा आवडता होता'

  • Thanks for loving An Action Hero. 😎
    Could’ve avoided the first line though 😇 I’m an SRKian!

    — Ayushmann Khurrana (@ayushmannk) February 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कमेंट वाचून आयुष्मानला व्यक्त होणे राहावले नाही. त्याने तातडीने याला उत्तर दिले आणि लिहिले की, ' अ‍ॅक्शन हिरोवर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. 😎पहिली ओळ टाळता आली असती तरीही मी SRKian आहे!''विनोदाच्या ऑफबीट व्यंग्यात्मक भावनेसह हा एक वेगवान अ‍ॅक्शनर अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट म्हणून ओळखला जाईल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. कथानक चांगले असूनही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो बॉक्स ऑफिसवर फेल - आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत यांचा चित्रपट 'अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो' 2 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुक होते. विशेषतः आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत यांची जोडी पाहण्यासाठी. मात्र आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असताना त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशीच 'अ‍ॅक्शन हिरो' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसला. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 2 कोटींची कमाईही करू शकला नाही.

आयुष्मानवर जयदीप अहलावत पडला भारी - अ‍ॅक्शन हिरोचा ट्रेलर पाहून लोक म्हणू लागले की या चित्रपटात जयदीप अहलावतने आयुष्मान खुरानाची बोलती बंद केली आहे. मात्र आता हा चित्रपट प्रदर्शित झाला परंतु, तो पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात पोहोचलेले नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 'अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आयुष्मानच्या मागील रिलीज झालेल्या अनेक या चित्रपटाच्या कलेक्शनपेक्षा खूपच कमी आहे.

हेही वाचा - Shah Rukh Khan Is India Tom Cruise : शाहरुख खान भारताचे टॉम क्रूझ; 'त्या' ट्विटने चाहते संतापले

Last Updated : Feb 4, 2023, 10:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.