ETV Bharat / entertainment

Amruta Fadnavis New Reel : अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत, रील स्टार रियाझ अलीसोबत शेअर केला व्हिडिओ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सगळीकडे अमृता फडणवीस यांच्या नव्या रिलची चर्चा जोरदार सुरू आहे. अमृता यांच्या नवीन पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाल्यानंतर रिल स्टार रियाझ अलीसोबत 'आज मूड बना लिया' या गाण्यावर रिल शेअर केले.

Amruta Fadnavis New Reel
उपमुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत
author img

By

Published : Jan 18, 2023, 3:55 PM IST

Updated : Jan 18, 2023, 4:01 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेत असतात. अमृता फडणवीस यांचे नवीन पंजाबी 'आज मूड बना लिया' गाणे रिलीज झाले आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणे चांगलेच धुमाकूळ घालत आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्याला नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळत असतो. त्यात त्यांच्या पहिल्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली आहे. अमृता फडणवीस यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. नव्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत ‘आज मूज बना लिया’ गाण्यावर रिल तयार केले आहे.

युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव : 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!' हे अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे बोल आहेत. रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तसेच हे गाणे पाहण्यासाठीदेखील सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या नव्या व्हिडीओवर अनेक युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. युजर्सने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले गुड जाॅब मामीजी तर दुसऱ्या युजरने लिहिले जय श्रीराम तर एकाने हार्ट इमोजी टाकले. अमृता फडणवीस त्यांच्या अनोख्या फॅशन सेन्स आणि मधुर आवाजमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. तसेच त्या राजकीय टोलेबाजीमुळेदेखील प्रसिद्ध आहेत. अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अमृता फडणवीसांची भूमिका : सध्या सुरू असलेल्या उर्फी जावेद आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादावर अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, चित्रा वाघ यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसे फिरत असाल, तर ते ठीक नाही. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाई करत आहेत. माझा विचार असा आहे की, उर्फीची जिथे फ्रोफेशनली कमीटमेंट नाही, तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिले तर चांगले आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचे झाले तर उर्फीही एक स्त्री आहे. ती जे काही करते आहे, ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगे वाटत नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

हेही वाचा : काश्मिरी हिंदू नरसंहार दिनी 'द काश्मीर फाइल्स' पुन्हा होणार रिलीज

Last Updated : Jan 18, 2023, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.