ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चनच्या पूर्ण चेहऱ्यावर चुंबनाचे व्रण, महिला फॅनचा प्रताप - अमिताभ बच्चन फिमेल फॅन

अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट समोर आली आहे, यामध्ये बिग बींच्या महिला चाहतीने त्यांच्या संपूर्ण चेहऱ्याचे चुंबन घेतले आहे.

अमिताभ बच्चनच्या पूर्ण चेहऱ्यावर चुंबनाचे व्रण

author img

By

Published : Jun 23, 2022, 3:37 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या फॅन फॉलोइंगची कमतरता नाही. वयाच्या ७९ व्या वर्षीही बिग आजही चाहत्यांच्या हृदयात स्थान टिकवून आहेत. बिग बींची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी क्षणोक्षणी सोशल मीडियावर सक्रिय असतात. बिग बी रोज काही ना काही पोस्ट करत असतात. आता बिग बींनी असाच एक फोटो शेअर केला आहे, जो त्यांच्या एका महिला चाहतीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा फोटो इतर फोटोंपेक्षा वेगळे आहे. चुंबनाने भरलेले हा फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करून बिग बींनी काय लिहिले आहे, हे वाचून चाहत्यांनाही ह,सू आवरले नाही. बिग बींनी हा फोटो शेअर करत लिहिले, 'अरे, पण देवी.. हसाण्यासाठी थोडीतरी जागा सोड!' या फोटोमध्ये बिग बींच्या संपूर्ण चेहऱ्यावर लिपस्टिकचा निशाणा आहे.

मस्करी करीत आहेत चाहते - आता हा फोटो बिग बींच्या चाहत्यांच्या डोळ्यांसमोर आल्यावर ते चिमटे काढू लागले. एका चाहत्याने लिहिले की, 'देवी जी कोण आहेत, जया जी यांना कदाचित माहित नसेल'. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'ये भी अच्छा है, किस ही किस मिले देवी जी से'.

या फोटोवर अनेक चाहत्यांनी स्माईल इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अनिल कपूर, वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेल्या जुग-जुग जिओ चित्रपटाचे हिट गाणे 'नाच पंजाबन' बाय हुक स्टेपचा फोटो शेअर केला होता.

हेही वाचा - 'सम्राट पृथ्वीराज'च्या अपयशासाठी आदित्य चोप्राने अक्षय कुमारला धरले जबाबदार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.