ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चनसह अनेक सेलेब्सनं 'द आर्चीज'च्या स्पेशल स्क्रिनिंगला लावली हजेरी - बच्चन कुटुंब

The Archies : झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चिज' चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग मंगळवारी 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याशिवाय बच्चन कुटुंब हे अगस्त्य नंदाला पाठिंबा देण्यासाठी यावेळी उपस्थित होते.

The Archies
द आर्चिज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 1:55 PM IST

मुंबई - The Archies : झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चिज' चित्रपटाचे मंगळवार, 5 डिसेंबर रोजी स्पेशल स्क्रिनिंग झाले. या चित्रपटातून अनेक स्टार किड्स हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत तयार आहेत, ज्यात पहिलं नाव अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचं आहे. याशिवाय शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर हे देखील या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'द आर्चिज' या चित्रपटाच्या प्रीमियरला हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये शिल्पा शेट्टी, रणबीर कपूर, मलायका अरोरा, करण जोहर, शनाया कपूर, बॉबी देओल, रिया कपूर अनन्या पांडे, कतरिना कैफ, इसाबेल कैफ यांच्यासह 'द आर्चीज'च्या स्क्रिनिंगला संपूर्ण बच्चन आणि शाहरुख खानचे कुटुंब उपस्थित होते. श्वेता नंदा, नव्या नवेली यांनीही अगस्त्यला पाठिंबा देण्यासाठी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

'द आर्चीज'चं स्क्रिनिंग : या स्क्रिनिंगमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन देखील आपल्या कुटुंबासोबत फोटो काढण्यासाठी रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ही पती अभिषेक, मुलगी आराध्या आणि अगस्त्य नंदासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. या इव्हेंटमध्ये स्टार्सचा एवढा मेळावा होता की, रेड कार्पेटवर फोटो क्लिक करण्यासाठी प्रत्येकाला रांगेत उभे राहावे लागले. याशिवाय अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला रेखाची उपस्थिती आश्चर्यचकित करणारी होती. रेखा, अमिताभ आणि जया बच्चन एकत्र दिसण्याचा हा खास प्रसंग होता. यावेळी रेखानं झोयासोबत फोटोसाठी पापाराझीला पोझ दिली.

'द आर्चीज' कधी प्रदर्शित होणार? : 'द आर्चीज' चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केले आहे. या चित्रपटातून अगस्त्य नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर व्यतिरिक्त मिहिर आहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंडा देखील आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. हा चित्रपट अतिशय लोकप्रिय कॉमिकचे भारतीय रूपांतर आहे. 'द आर्चीज' 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर 'द आर्चीज' स्क्रिनिंगमध्ये एकत्र
  2. 'द आर्चीज' प्रीमियरमध्ये जया बच्चन पापाराझीवर भडकली, ट्रोलर्सना दिलं आमंत्रण
  3. सना रईस खाननं काम करण्यास दिला नकार दिल्यानं बिग बॉसमध्ये गृहकलह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.