ETV Bharat / entertainment

Allu Arjun meets Atlee : मुंबईत अ‍ॅटलीच्या भेटीसाठी अल्लु अर्जुन, नव्या सिनेमासाठी दोघांची हात मिळवणी - सुपरस्टार अल्लू अर्जुन

Allu Arjun meets Atlee : पुष्पा स्टार अल्लू अर्जुन आणि जवानचा दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्यात आगामी चित्रपटासाठी सहमती झाली आहे. या मिटींगसाठी अल्लु अर्जुन अ‍ॅटलीच्या भेटीसाठी मुंबईला आला होता. दोघांच्या नव्या संकल्पनेवर साकारात्मक चर्चा झाल्याचं समजतं.

Allu Arjun meets Atlee
अ‍ॅटलीच्या भेटीसाठी आला अल्लु अर्जुन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 3:56 PM IST

Updated : Sep 23, 2023, 5:04 PM IST

मुंबई - Allu Arjun meets Atlee : सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या बहुप्रतिक्षित पुष्पा 2 चित्रपटाच्या शुटिंग खूप बिझी आहे. यातून सवड काढून तो मुंबईत जवान चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या भेटीसाठी मुंबईत आला होता. अ‍ॅटली कुमारच्या आगामी चित्रपटात अल्लु अर्जुन मुख्य स्टार कास्ट असणार आहे. या चित्रपटाच्या संकल्पनेवर दोघांनी काही तास एकत्र घालवले.

मिलालेल्या माहितीनुसार अभिनेता अल्लु अर्जुन दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारच्या भेटीसाठी मुंबईत आला होता. त्यांची ही बैठक अत्यंत फलदायी ठरल्याचं कळतंय. दोघेही नव्या चित्रपटाच्यासाठी उत्साही आहेत. ही चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात असली तरी सस्पेन्स ड्रामा असलेल्या या बिग बजेट अ‍ॅक्शन थ्रिलरसाठी दोघांनी सहमती दर्शवली आहे.

जवानच्या उत्तुंग यशामुळे अ‍ॅटली कुमार हा देशातील सर्वाधिक डिमांड असलेला दिग्दर्शक बनलाय. या पार्श्वभूमीवर त्यानं अल्लु अर्जुनला समोर ठेवून कोणती स्क्रिप्ट लिहिली आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोघांची जोडी साऊथमध्ये सर्वाधिक हिट ठरु शकते. अलिकडे अल्लु अर्जुनच्या पुष्पाला मिलालेल्या प्रसिद्दीमुळे तो देशभरात लोकप्रिय ठरलाय. त्यामुळे त्यांचा हा आगामी चित्रपट पॅन इंडिया असेल यात काही शंका नाही. अ‍ॅटली कुमार हा त्याच्या उत्कृष्ट कथाकथनासाठी ओळखला जातो. त्यामुळे या चित्रपटाकडे देशाच्या नजरा लागतील.

अल्लु अर्जुनचा बहुप्रतीक्षित पुष्पा 2 हा चित्रपट पुढील वर्षी 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. सुकुमार दिग्दर्शित या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मैत्री मुव्हीजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग जेव्हा बनला तेव्हाच दुसऱ्या भागाचेही शुटिंग झाले होते. मात्र नंतर दिग्दर्शक सुकुमारला ते पसंत पडले नाही आणि नव्याने सीन्स सुट करण्याचा त्यानं निर्णय घेतला. सध्या या चित्रपटाची निर्मिती रामोजी फिल्म सिटीतील वेगवेगळ्या लोकेशन्सवर होत आहे. मध्यंतरी या शुटिंगच्या सेटवर पोहचतानाचा व प्रत्यक्ष शुटिंग करतानाचा व्हिडिओ स्वतः अल्लु अर्जुनने शेअर केला होता.

हेही वाचा -

१. The Great Indian Family Box Office: विकी कौशलची जादु चालली नाही, द ग्रेट इंडियन फॅमिलीची खराब सुरुवात

२. Kangana Ranaut Reacts To Bjp Mp : रमेश बिधुरींच्या वक्तव्यावर कंगना रणौतची प्रतिक्रिया: 'कुणीही मर्यादेचं उल्लंघन करु नये'

३. Ishaan Khatter Date With Chandni : गर्लफ्रेंड चांदनी बेंझसोबत डेट करताना दिसला इशान खट्टर

Last Updated : Sep 23, 2023, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.