ETV Bharat / entertainment

Alia Bhatt : आलिया भट्टनं 'जिगरा'साठी दिग्दर्शक वासन बालासोबत केली हात मिळवणी... - आलिया भट्ट आणि जिगरा चित्रपट

Alia Bhatt : आलिया भट्ट त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'जिगरा'साठी दिग्दर्शक वासन बालासोबत हात मिळवणी केली आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन आणि आलियाचे इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन करणार आहेत.

Alia Bhatt
आलिया भट्ट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 3:55 PM IST

मुंबई - Alia Bhatt: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट हिट झाल्यानंतर आलिया भट्ट आगामी 'जिगरा' या चित्रपटात झळकणार आहे. 'जिगरा' या चित्रपटाचं दिग्दर्शन वासन बाला करणार आहेत. 'जिगरा' या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या चित्रपटात करण जोहर आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती दोघे मिळीन करणार आहेत. करण जोहर आणि आलिया भट्ट या दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या व्हिडिओमध्ये आलियानं व्हॉईस ओव्हर दिला असून या चित्रपटामधील तिचं लूक देखील दाखविण्यात आला आहे.

आलिया आणि करणनं केला व्हिडिओ पोस्ट : सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आलिया तिच्या लहान भावाला सांगताना दिसत आहे की, ती त्याला काहीही होऊ देणार नाही. 'जिगरा' चित्रपटामध्ये आलिया एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कहाणी ही बहिण भावाच्या अतूट प्रेम आणि अटळ धैर्याची असेल. आलिया आणि करणनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहे. आलियाच्या एका चाहत्यानं लिहलं, 'जिगरा' चित्रपट पाहण्यासाठी मी आता थांबू शकत नाही' तर दुसऱ्या एका यूजरनं लिहलं, 'आलिया ही प्रत्येक चित्रपटामध्ये चांगला अभिनय करते, हा चित्रपट मी नक्की पाहिल' तर काही यूजरनं आलिया आणि करणला ट्रोल केलं आहे.

आलिया आणि करणला करण्यात आले ट्रोल : आलिया आणि करणला ट्रोल करत एका यूजरनं लिहलं, 'पुन्हा एकदा आलिया करणच्या चित्रपटात दिसणार का?' दुसऱ्या एकानं लिहलं, आलिया ही स्वत:ची खूप चांगली मार्केटिंग करते. तिसऱ्या एकानं लिहलं, 'दुसऱ्याला तरी संधी द्या हिला पाहून आता कंटाळा आला आहे'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. आलियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट करण जोहरनं दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाद्वारे करण जोहर दीर्घ काळानंतर दिग्दर्शनात परतला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला आहे.

हेही वाचा :

  1. Movie Teen Adakun Sitaram : आलोक राजवाडेचा लंडनमध्ये झाला होता 'तीन अडकून सीताराम'
  2. Dadasaheb Phalke Award 2023 : वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार
  3. Jawan Box Office Collection Day 20 : 'जवान' चित्रपटाच्या कमाईत झाली बॉक्स ऑफिसवर घसरण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.