मुंबई - Alia Bhatt Deepfake Video : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री काजोल आणि कतरिना कैफ यांच्यानंतर आता आलिया भट्टही डीपफेकची शिकार झाली आहे. काल आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून, आलिया भट्टचा चेहरा एका मुलीच्या चेहऱ्यावर लावण्यात आला. हा व्हिडिओ अश्लील असल्यानं अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. आलिया भट्टचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिनं यावर प्रतिक्रिया दिली. तिनं एक्सवर एक पोस्ट शेअर करून महिलांना जागरूक केलं.
-
A much needed initiative by @NCWIndia – 'Her Legal Guide' It's every woman’s go-to for legal wisdom on Indian constitutional law, reproductive rights, CRPC, sexual offenses, and cyber crimes. Join the movement for a safer, and an informed society today!
— Alia Bhatt (@aliaa08) November 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Download now and empower… pic.twitter.com/8WaYvFZZzt
">A much needed initiative by @NCWIndia – 'Her Legal Guide' It's every woman’s go-to for legal wisdom on Indian constitutional law, reproductive rights, CRPC, sexual offenses, and cyber crimes. Join the movement for a safer, and an informed society today!
— Alia Bhatt (@aliaa08) November 27, 2023
Download now and empower… pic.twitter.com/8WaYvFZZztA much needed initiative by @NCWIndia – 'Her Legal Guide' It's every woman’s go-to for legal wisdom on Indian constitutional law, reproductive rights, CRPC, sexual offenses, and cyber crimes. Join the movement for a safer, and an informed society today!
— Alia Bhatt (@aliaa08) November 27, 2023
Download now and empower… pic.twitter.com/8WaYvFZZzt
आलिया भट्टनं उचलले हे पाऊल : आलिया भट्टनं तिच्या व्हायरल डीपफेक व्हिडिओकडे दुर्लक्ष न करता तिच्या एक्स-हँडलवर लिहिलं तिनं लिहिलं, 'हर लीगल गाईड' (Her Legal Guide) एनसीडब्ल्यू इंडिया (द नॅशनल कमिशन फॉर वुमन) चा एक अत्यंत आवश्यक उपक्रम आहे. हे अॅप प्रत्येक महिलेनं वापरावं. हे अॅप संवैधानिक कायदा, प्रजनन अधिकार, सीआरपीसी, लैंगिक याविषयी माहिती देते. गुन्हेगारी आणि सायबर गुन्ह्यांबद्दल माहितीसाठी प्रत्येक स्त्रीसाठी उपयुक्त हे अॅप आहे. सुरक्षित आणि जागरूक समाजासाठी आजच सामील व्हा, डाउनलोड करा आणि सक्षम व्हा'. असं तिनं सांगितलं आहे
चाहते कौतुक करत आहेत : आलिया भट्टच्या या पोस्टवर तिचे चाहते तिच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. एका यूजरनं तिच्या पोस्टवर लिहिलं की, 'महिला, समाजात तसेच सोशल मीडियावर असुरक्षित झाल्या आहेत आणि त्यांच्या गोपनीयता आणि अधिकारांसाठी हे पाऊल कौतुकास्पद आहे'. दरम्यान अनेकजणांनी महिला संरक्षणावर आलिया भट्टची ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन केलं आहे. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुढं ती 'जी ले जरा' आणि 'जिगरा'मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :