मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच चाहत्यांना खुशखबर देणार आहे का? आलिया भट्ट आई होणार आहे का? खरंतर, अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून चाहत्यांचे चेहरे फुलू लागले आहेत. आलिया भट्टने सोमवारी दोन फोटो शेअर केले, ज्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. त्यावेळी तिचा पती रणबीर कपूर आलियासोबत कॅप घालून बसला आहे. दोघेही समोरच्या अल्ट्रासाऊंड मशीनकडे पाहत आहेत, ज्यामध्ये हृदय दिसत आहे.
त्यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत सिंहाचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. हे फोटो शेअर करत आलिया भट्टने लिहिले आहे की, 'आमचे बाळ... लवकरच येत आहे'. आलिया भट्टने याचवर्षी १४ एप्रिल रोजी बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला अडीच महिने झाले असून या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिची वहिनी रिद्धिमा कपूरने आलिया भट्टला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये रकुल प्रीत, मौनी रॉय आणि डायना पेंटीसह अनेक चाहत्यांनी आलियाचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी, या बातमीमुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या चाहत्यांचे चेहरे फुलले आहेत आणि ते या जोडप्याचे जोरदार अभिनंदन करत आहेत.
यावर्षी रणबीर आणि आलियाची जोडी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. याआधी आलियाचा नवरा आणि रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्टने 'शमशेरा' चित्रपटाचे सर्व पोस्टर्स आणि ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा - शाहरुखची बॉलिवूडमध्ये ३० वर्षे पूर्ण, चाहत्यांचे मानले आभार