मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण ती आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत ठसा उमटवण्याआधी, अभिनेत्री आलिया मेट गाला या वर्षातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये पदार्पण करणार आहे. मातृत्वाचा आनंद घेत असलेली आलिया भट्ट मे महिन्यात सर्वात मोठ्या फॅशन एक्स्ट्राव्हॅगंझाच्या प्रतिष्ठित रेड कार्पेटवर उतरणार आहे.
मेट गाला रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्री - तिच्या मेट गाला पदार्पणाच्या प्रसंगी, आलिया भट्टसाठी प्रबल गुरुंग डिझाइन करताना दिसणार आहे. आलियापूर्वी, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण सारख्या बॉलिवूड अभिनेत्रींनी आंतरराष्ट्रीय उत्सवात बाजी मारली होती. मेट गालामधील भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत ईशा अंबानी, नताशा पूनावाला आणि सुधा रेड्डी यांचाही समावेश आहे. मेट गालाच्या रेड कार्पेटवर उतरण्याचे स्वप्न जगभरातील सौंदर्यवती बाळगून असतात. आलिया भट्ट यशाची शिखरे चढत असून तिचेही हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
एलेनॉर लॅम्बर्टच्या कलात्मक तेजाचा सन्मान - मेट गालाची स्थापना 1948 मध्ये फॅशन प्रचारक एलेनॉर लॅम्बर्ट यांनी नव्याने स्थापन केलेल्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटच्या वार्षिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी निधी उभारण्यासाठी म्हणून केली होती. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी अशी आहे, जी दिवंगत डिझायनर एलेनॉर लॅम्बर्टच्या कलात्मक तेजाचा सन्मान करेल आणि त्याच्या उत्क्रांतीचा शोध घेईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्कफ्रंटवर आलिया भट्ट - दरम्यान, कामाच्या आघाडीवर, आलियाला नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट गल गडॉटसोबत भूमिका असलेला आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपटही यावर्षातील रोमँटिक आकर्षण असणार आहे. 2022 हे वर्ष तिच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर अत्यंत फायद्याचे वर्ष होते कारण तिने रणबीर कपूरशी लग्न केले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची मुलगी राहा हिचेही स्वागत केले. गंगूबाई काठियावाडी, आरआरआर, ब्रह्मास्त्र आणि डार्लिंग्ज यांसारखे तिचे चित्रपट सर्वत्र मोठे यश मिळवून गेले.
हेही वाचा - Suhana Khan Sparks Nepotism Debate : सुहाना खान बनली मेबेलाइनची ब्रँड अॅम्बेसेडर, नेपोटिझमच्या चर्चेला उधाण