ETV Bharat / entertainment

Akshay kumar : फ्लॉपच्या भितीपोटी अक्षय कुमारने 'ओ माय गॉड २' साठी घेतला 'हा' निर्णय?

author img

By

Published : Jul 13, 2023, 6:15 PM IST

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट ओ माय गॉड २मुळे चर्चेत आहे. अक्षयने या चित्रपटासाठी किती पैसे घेते हे तुम्हाला माहित आहे का? तसेच बाकी कलाकारांनीही या चित्रपटासाठी किती पैसे घेतले हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Akshay kumar
अक्षय कुमार

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'ओ माय गॉड २'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 'ओ माय गॉड २ या चित्रपटात अक्षय कुमार महादेवची भूमिका साकारत आहे. अक्षय या चित्रपटात फार वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. अक्षयचा हा लूक चाहत्यांना फार भावला आहे. अक्षय कुमारला त्याच्या या चित्रपटांकडून फार जास्त आशा आहेत. गेल्या काही दिवसांपासून अक्षयचे सतत चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहे. त्यामुळे त्याने आपल्या फीमध्ये देखील आता कपात केली आहे. त्याने ओह माय गॉड २ या चित्रपटातील महादेवच्या पात्रासाठी फार कमी फी घेतली आहे. चला तर जाणून घेवूया या चित्रपटासाठी अक्षय किती रुपये घेतलेत.

अक्षयने महादेव बनण्यासाठी किती फी घेतली : सेल्फी, सम्राट पृथ्वीराज, राम सेतू आणि रक्षाबंधन यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नसल्याने अक्षय कुमारच्या स्टारडमला आता धोका निर्माण आहे. लवकरच अक्षय हा 'ओ माय गॉड २'च्या माध्यमातून प्रेक्षकांना महादेवच्या रुपात भेटीला येणार आहे. दरम्यान 'ओ माय गॉड २' या चित्रपटासाठी अक्षय कुमारने फक्त ३५ कोटी फी घेतली आहे. यापुर्वी अक्षय हा प्रत्येक चित्रपटासाठी ५० ते १०० कोटी फी घेत होता, मात्र त्याने आता या चित्रपटाच्या फीमध्ये कपात केला आहे. दुसरीकडे, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी ५ कोटी आणि २ कोटी रुपये या चित्रपटासाठी घेतल्याचे समजत आहे. परंतु अद्यापही याबाबत पुष्टी झालेली नाही आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : या चित्रपटात यामी गौतम ही महिला वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अमित राय यांनी दिग्दर्शित केला आहे. दरम्यान हा चित्रपट रूपेरी पडद्यावर ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या दिवशी सनी देओलच्या गदर २ देखील चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. SPKK Collection Week 2 : 'सत्यप्रेम की कथा'ने गुडघे टेकले, टॉम क्रूझचा वारु सुसाट
  2. SRK's in bald look : शाहरुखच्या बाल्ड लूकवर फॅन्स फिदा, पोस्टवर प्रेमाचा वर्षाव
  3. Suniel Shetty : सुनिल शेट्टीला टोमॅटो महाग, नेटीझन्सनी केली खरडपट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.