मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा पिरियड फिल्म 'सम्राट पृथ्वीराज' या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या यशासाठी अक्षय कुमार पूजा करण्यासाठी काशीच्या घाटावर पोहोचला होता. यावेळी अक्षयसोबत चित्रपटाची अभिनेत्री मानुषी छिल्लरही होती. चित्रपटाच्या स्टारकास्टने सोशल मीडियावर गंगा घाटावरील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अक्षय कुमार आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर स्टारर चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज' 3 जूनला रिलीज होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याने घाटावरील आरतीनंतर गंगेत स्नान केले. हा व्हिडिओ अक्षय कुमारने 'हर हर महादेव' असे लिहून शेअर केला आहे.
![मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15431674_3.jpg)
त्याचबरोबर चित्रपटाची अभिनेत्री मानुषी छिल्लरनेही काशीतील अनेक फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करत हर हर महादेव असे लिहिले आहे. या फोटोंमध्ये अक्षय आणि मानुषी पीच रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत.
![मानुषी छिल्लर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15431674_4.jpg)
मानुषीचा हा डेब्यू चित्रपट आहे. दरम्यान अक्षय कुमारचा यापूर्वीचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यानंतर आता अक्षय कुमार चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद घेण्यासाठी काशीला पोहोचला आहे.
!['सम्राट पृथ्वीराज'च्या यशासाठी केली काशीत गंगा पूजा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15431674_45.jpg)
यापूर्वी 'भूल-भुलैया-2'ची स्टारकास्ट कार्तिक आर्यन काशीच्या घाटावर पोहोचली होती. भूल भुलैया 2 ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेला कार्तिक आर्यनचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 20 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 125 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
हेही वाचा - OTT मुळे भारतीय सिनेमा ग्लोबल झाला - चित्रपट निर्माते पियुष पांडे