मुंबई : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपट 'ओएमजी 2'मुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा सिग्नल मिळाला आहे. 'ओएमजी 2' चित्रपटातील कलाकार चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करत आहेत. अलीकडेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सद्गुरूंसाठी 'ओएमजी 2'चे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. त्यानंतर सद्गुरुंनी सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीच्या या चित्रपटाचे कौतुक केले.
सद्गुरुंनी 'ओएमजी 2' चित्रपट पाहिला : अक्षय कुमारने सोमवारी सद्गुरुंसाठी 'ओएमजी 2' या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. आता या चित्रपटाबाबत सद्गुरुंची ट्विटरवर एक प्रतिक्रिया आली आहे. सद्गुरु यांनी चित्रपटाबाबत लिहीत म्हटले, 'या प्रकरणात 'अ' प्रमाणपत्रामध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश असावा. हे सर्वात महत्त्वाचे आहे. मानवी जीवशास्त्र समजून घेणे आणि एखाद्या व्यक्तीच्या जैविक गरजांना प्रतिष्ठित आणि जबाबदारीने प्रतिसाद देण्याचे शिक्षण सर्व सहभागींसाठी न्याय्य आणि न्याय्य राष्ट्र निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे', असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अक्षय कुमारने सद्गुरुंच्या पोस्टला उत्तर देताना, 'खूप खूप धन्यवाद सद्गुरुजी. आशा आहे की हा संदेश योग्य भावनेने दूरदूरपर्यंत पोहोचेल,'या शब्दांत भावना व्यक्त केल्या.
'ओएमजी 2' बद्दल : अमित राय दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार साक्षात देवाधिदेव महादेवाच्या अवतारात पडद्यावर दिसणार आहे. 'ओएमजी 2' मध्ये यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि 'रामायण' फेम अरुण गोविल देखील रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'ओएमजी 2' हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या 'ओएमजी' चित्रपटाचा सीक्वल आहे. पहिल्या भागात परेश रावलने साकारलेली व्यक्तिरेखा सिक्वलमध्ये पंकज त्रिपाठीला साकारण्याची संधी मिळाली आहे. परेश रावल आणि चित्रपटाचे निर्माते यांच्यात मानधनाबाबत बिनसल्यामुळे हा चित्रपट अलगद पंकज त्रिपाठीच्या झोळीत गेला, अशी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. केप ऑफ गुड फिल्म्स, अश्विन यार्दी, विपुल डी शाह आणि राजेश बहल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते आहेत.
हेही वाचा :