हैदराबाद - अभिनेता अजित कुमारचे वडील पी सुब्रमण्यम मणी यांचे शुक्रवारी वयाच्या ८५ व्या वर्षी घरी झोपेतच निधन झाले. कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनानुसार, ते बऱ्याच काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. अजितच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले अजित, अनिल आणि अनुप असा परिवार आहे.
-
My deepest condolences to dear #Ajith and to his family, friends, relatives and well wishers for the loss of his father.
— R Sarath Kumar (@realsarathkumar) March 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
May his soul rest in peace#RIPSubramaniam #AjithKumar pic.twitter.com/poNRV7JG7U
">My deepest condolences to dear #Ajith and to his family, friends, relatives and well wishers for the loss of his father.
— R Sarath Kumar (@realsarathkumar) March 24, 2023
May his soul rest in peace#RIPSubramaniam #AjithKumar pic.twitter.com/poNRV7JG7UMy deepest condolences to dear #Ajith and to his family, friends, relatives and well wishers for the loss of his father.
— R Sarath Kumar (@realsarathkumar) March 24, 2023
May his soul rest in peace#RIPSubramaniam #AjithKumar pic.twitter.com/poNRV7JG7U
अजितच्या फॅन क्लब पेजवर कुटुंबाकडून एक स्टेटमेंट शेअर करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, 'प्रदीर्घ आजारानंतर आमचे वडील पीएस मणी यांचे शुक्रवारी पहाटे झोपेत असताना निधन झाले. चार वर्षांपूर्वी त्यांच्यावरील स्ट्रोकनंतर त्यांना आणि आमच्या कुटुंबाला अनेक वैद्यकीय तज्ञांनी घेतलेल्या काळजी आणि दिलेल्या मदतीबद्दल आम्ही आभारी आहोत.' त्यात पुढे म्हटले आहे की, मणी चांगले आयुष्य जगले, त्यांना आपल्या पत्नीचे किती अतूट प्रेम मिळाले याची आम्हाला जाणीव आहे. जवळपास सहा दशके त्यांनी कुटुंबाच्या कठीण काळात मोलाची साथ दिली. आमचे सांत्वन करणारे, शोक संदेश पाठवणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. आम्ही वेळेवर कॉल घेऊ शकत नसलो किंवा संदेशांना प्रतिसाद देऊ शकत नसलो तर तुमची समजूत काढतो, असे निवेदनात म्हटलंय.
सरथ कुमार आणि साक्षी अग्रवाल यांच्यासह सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरही अजितच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. सरथ कुमार यांनी ट्विट केले, 'प्रिय अजित, वडिलांच्या निधनाबद्दल तुमचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक आणि हितचिंतक यांच्यासाठी माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.' तर साक्षी अग्रवाल हिने ट्विट केले आहे की, 'अजित कुमार सर आणि कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना! हे नुकसान भरून काढण्यासाठी देव त्यांना शक्ती देवो.'
अजित कुमार हे दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीचे नाव आहे. साऊथमध्ये सुपरस्टार्सची मांदियाळी असताना आपला एक स्वतंत्र प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. आपल्या साहसी दृष्टातून ते प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी झाले आहे. अजित कुमार यांना पितृशोक झाल्याने चाहते शोक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - Akshay Kumar Injured : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या सेटवर अक्षय कुमार झाला जखमी