ETV Bharat / entertainment

अजय देवगणने मुलगी न्यासाच्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला खुलासा - अजय देवगणची मुलगी बॉलिवूड

अजय देवगणने त्याची मुलगी न्यासा देवगणच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल खुलासा केला आहे. न्यासा आणि युग यांनी चित्रपटात प्रवेश करावा असे त्याला आणि त्याची पत्नी काजोल यांना वाटते का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर बोलताना अजय म्हणाला की काजोल आणि तो मुलांवर दबाव आणणार नाहीत परंतु ते त्यांच्या आयुष्यासाठी जे काही निर्णय घेतील त्यासाठी ते ठामपणे पाठीशी राहून मदत करतील.

अजय देवगणने मुलगी न्यासा
अजय देवगणने मुलगी न्यासा
author img

By

Published : Apr 27, 2022, 1:15 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अजय देवगण त्याचा नवीन 'रनवे 34' या चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता देखील असलेला अभिनेता अजय देवगण रनवे 34 च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीखजवळ येत जवळ आल्यामुले तो प्रचंड बिझी झाला आहे. प्रमोशनच्या वेळी अजयने त्याची मुलगी न्यासा देवगणच्या बॉलिवूडच्या स्वप्नांबद्दलही सांगितले.

रनवे 34 साठीच्या प्रमोशनल मुलाखतीदरम्यान अजय देवगणला विचारले गेले की त्याला आणि त्याची अभिनेत्री पत्नी काजोल यांना त्यांची मुले- न्यासा आणि युग यांचा चित्रपटांमध्ये प्रवेश करायचा आहे का? याला अजयने उत्तर दिले की न्यासा आणि युग यांच्यावर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे दडपण नाही कारण ते त्यांना कधीही विशेष काही करण्यास सांगत नाहीत. मुले त्यांच्या भविष्यासाठी जे काही निर्णय घेतील त्यामध्ये त्यांना दोघेही मदत करतील. अजयने असेही म्हटले की, त्यांची मुले कोणताही मार्ग स्वीकारतील त्यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत.

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा 20 एप्रिल रोजी 19 वर्षांची झाली. न्यासा देवगण सध्या स्वित्झर्लंडच्या ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहेत. जर तिने तिच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तर त्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

हेही वाचा - Dhanush The Gray Man Look : धनुषचा हॉलीवूड चित्रपट ''द ग्रे मॅन''चा फर्स्ट लूक प्रसिध्द, रिलीजची तारीखही जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.