मुंबई - अभिनेता अर्जुन कपूर त्याचा 37 वा वाढदिवस पॅरिसमध्ये आणि तोही त्याची प्रेयसी मलायका अरोरासोबत साजरा करणार आहे. शुक्रवारी पहाटे अर्जुन आणि मलायका वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसला रवाना झाले. या जोडप्याला विमानतळावर अनेकजणांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. अर्जुन कपूरचा २६ जून रोजी वाढदिवस आहे.
अर्जुनच्या जवळच्या स्त्रोताने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल काही तपशील शेअर केले आहेत. "अर्जुनला अलीकडेच सुट्टी मिळाली नाही. त्याने त्याच्या चित्रपटांसाठी बॅक टू बॅक शूट केले आहे आणि त्याच्या फिटनेस प्रवासामुळे त्याला उसंत मिळाली नाही. अर्जुन एक व्हिलन 2 साठी जोरदार प्रमोशन करेल परंतु त्याआधी त्याला वाढदिवस शांतपणे घालवायचा आहे. तो मलायकासोबत पॅरिसला गेला आहे आणि ते दोघे जगातील सर्वात रोमँटिक शहरात एक आठवडा एकत्र घालवतील, असे सूत्राने सांगितले.
दोघे विमानतळावर आले तेव्हा शटरबग्स त्यांना क्लिक करत आणि फॉलो करत राहिले. हौशी फोटोग्राफर्सशी गप्पा मारत असतानाअर्जुननेही टोमणा मारला, "बस, इव्हेंट के लिए थोडे आये है, फ्लाइट लेनी है."
दरम्यान वर्क फ्रंटवर अर्जुन कपूर दिग्दर्शक मोहित सुरीच्या बहुप्रतिक्षित 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील आहेत. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
कलाकारांनी गेल्या वर्षी शूटिंग पूर्ण केले आणि चित्रपट आधी 8 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु या महिन्याच्या सुरुवातीला निर्मात्यांनी तारीख पुढे ढकलून 29 जुलै केली. 'एक व्हिलन रिटर्न्स' व्यतिरिक्त, अर्जुन आस्मान भारद्वाजच्या कुट्टे आणि अजय बहलच्या 'द लेडी किलर' मध्ये देखील दिसणार आहे.
हेही वाचा - राजकुमार रावच्या 'हिट द फर्स्ट केस' चित्रपटाचा धक्कादायक ट्रेलर रिलीज