ETV Bharat / entertainment

Shamita Shetty Breaks Silence : शमिता शेट्टीने आमिर अलीला डेट करण्याच्या अफवांवर सोडले मौन - शमिता शेट्टीने आमिर अलीला डेट अफवांवर सोडले मौन

शमिता शेट्टी आणि आमिर अली यांच्या डेटिंगच्या अफवा पसरत आहेत. पण, शमिता शेट्टीने तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील या अंदाजांना धुडकावून लावत अफवा असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने डेटिंगच्या अफवांना संबोधित करण्यासाठी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. काय म्हटले आहे या अभिनेत्रीने पाहा............

Shamita Shetty Breaks Silence
शमिता शेट्टीने आमिर अलीला डेट करण्याच्या अफवांवर सोडले मौन; गुडबाय किस व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा
author img

By

Published : Jan 31, 2023, 4:02 PM IST

Updated : Jan 31, 2023, 4:42 PM IST

मुंबई : राकेश बापटसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीची लव्ह लाईफ पुन्हा चर्चेत आली आहे. शमिता पुन्हा प्रेम शोधत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत. आमिर अलीने शमिताच्या गालावर अलविदा चुंबन घेतल्याच्या व्हिडिओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि दोघे एकमेकांना डेट करीत असल्याच्या कयासांना उधाण आले.

अफवांना दिले प्रत्त्युत्तर : अफवांचे पेव सतत फुटत असताना, शमिताने सोशल मीडियावर अशा अनुमानांना तोंड देत चोख उत्तर दिले आहे. ट्विटरवर शमिताने स्पष्ट केले की ती “अविवाहित आणि आनंदी” आहे. तिने समाजाच्या "संकुचित विचारसरणी" बद्दलून त्याचा खरपूस समाचार घेतला. तिने लिहिले, मी माझ्या बद्दलच्या अफवांनी चकित झाले आहे आणि या प्रकारच्या मानसिकतेचा समाचार घेण्यासाठी मी विवेकपूर्वक या अफवांना उत्तर देणार आहे.

मन मोकळे करण्याची वेळ : 43 वर्षीय अभिनेत्रीने पुढे लिहिले, "प्रत्येक कृती आणि प्रत्येक व्यक्तीची कोणतीही वास्तविकता तपासणी न करता छाननी किंवा निर्णय घेण्याच्या अधीन का आहे? NETIZENS च्या संकुचित कल्पनेच्या पलीकडे शक्यता आहेत." ती पुढे म्हणते, "आपण त्यासाठी आपले मन मोकळे करण्याची वेळ आली आहे. मी सिंगल आहे आणि हॅपी आहे. या देशातील आणखी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया."

  • I'm baffled by society and it's convenient prudish mindset all across. Why is every action and every person subjected to scrutiny or snap judgement with no reality check? There are possibilities beyond the narrow-minded assumptions of the NETIZENS,

    — Shamita Shetty 🦋 (@ShamitaShetty) January 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आमिरसोबत डेटिंग : शमिताच्या आमिरसोबत डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या होत्या जेव्हा ते दोघे नुकतेच मुंबईत मित्रांसोबत पार्टीत दिसले होते. पापाराझी व्हिडिओंपैकी एकामध्ये, आमिर शमिताला तिच्या कारमध्ये घेऊन जाताना आणि तिच्या गालावर अलविदा चुंबन देताना दिसला.

आधी राकेश बापटला डेट : 'बिग बॉस ओटीटी' दरम्यान दोघे प्रेमात पडले. तथापि, थोड्या काळासाठी डेटिंग केल्यानंतर दोघे वेगळे झाले. शमिताने राकेशसोबतच्या ब्रेकअपची घोषणाही सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. "मला हे स्पष्ट करणं महत्त्वाचं वाटतं. राकेश आणि मी आता एकत्र नाही आणि काही काळासाठीही नाही, पण हा म्युझिक व्हिडिओ त्या सर्व सुंदर चाहत्यांसाठी आहे ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. आमच्यावर वर्षाव करत राहा. व्यक्ती म्हणून तुमच्या प्रेमासह. ही सकारात्मकता आणि नवीन क्षितिजे सर्वांसाठी प्रेम आणि कृतज्ञता आहे," ती म्हणाली.

  • it's high time we open our minds to it! Single n happy .. let’s focus on more important issues in this country!

हेही वाचा : Pathaan New Record : 'पठाण' ठरला जलद 300 कोटी कमावणारा चित्रपट, KGF-2 सह 'या' 9 चित्रपटांना चारली धूळ

Last Updated : Jan 31, 2023, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.