ETV Bharat / entertainment

जॅकलिन फर्नांडिसनंतर आता नोरा फतेहीची खंडणी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून चौकशी - दिल्ली पोलिसांकडून चौकशी

जॅकलीन फर्नांडिसच्या चौकशी नंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गुरूवारी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला चौकशीसाठी 11 वाजता बोलवले आहे. हे प्रकरण 200 कोटी रुपयांच्या सुकेश चंद्रशेखर खंडणी व फसवणुकीशी संबंधित आहे. नोराची यापूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याच प्रकरणात ईओडब्ल्यूने चौकशी केली होती.

नोरा फतेही
नोरा फतेही
author img

By

Published : Sep 15, 2022, 11:26 AM IST

नवी दिल्ली - अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची बुधवारी आठ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गुरूवारी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला चौकशीसाठी 11 वाजता बोलवले आहे. हे प्रकरण 200 कोटी रुपयांच्या सुकेश चंद्रशेखरने केलेल्या खंडणी व फसवणुकीशी संबंधित आहे, करोडपती ठग सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. नोराची यापूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याच प्रकरणात ईओडब्ल्यूने चौकशी केली होती.

बुधवारी सकाळी 11 वाजता जॅकलिन ईओडब्ल्यू कार्यालयात पोहोचली आणि रात्री 8 वाजेपर्यंत तिची चौकशी सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नोराची चौकशी केल्यानंतर जॅकलिनला पुन्हा कधी बोलावायचे याचा निर्णय पोलिस घेतील. बुधवारी या प्रकरणातील आणखी एक आरोपी पिंकी इराणी हिच्याशी जॅकलिनचा सामना झाला.

फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांच्यासह काही हाय-प्रोफाइल लोकांची फसवणूक आणि खंडणी घेतल्याप्रकरणी चंद्रशेखरला अटक करण्यात आली होती. चंद्रशेखरशी असलेल्या कथित संबंधांमुळे अंमलबजावणी संचालनालयाने अनेक बॉलिवूड कलाकार आणि मॉडेल्सची चौकशी केली आहे.

हेही वाचा - हातात मद्याचा ग्लास धरत मौनी रॉयचा बिनधास्त डान्स व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.