ETV Bharat / entertainment

Elvish yadav case : यूट्यूबर एल्विश यादव म्हणाला, 'माझी श्रीरामजींवर श्रद्धा'

Elvish yadav case : यूट्यूबर एल्विश यादववर रेव्ह पार्टी आयोजित करणे, सापाचे विष पुरवणे आणि परदेशी मुली पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. याप्रकरणी त्याची आता कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान त्यानं एक्सवर एक ट्विट करून आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहेत.

Elvish yadav case
एल्विश यादव केस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 10:55 AM IST

मुंबई - Elvish yadav case : यूट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता एल्विश यादवच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानं आपल्यावरचे आरोप चुकीचं असल्याचं ट्विट करून सांगितले आहे. या प्रकरणात लवकरच आरोपीना शिक्षा होण्याची शक्यता आहे. एल्विशवर रेव्ह पार्टी आयोजित करणे, सापाचे विष पुरवणे आणि परदेशी मुली पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी, पोलिसांनी एल्विश यादवला राजस्थानमध्ये पकडल्यानंतर, त्यानं नोएडा पोलिसांशी संपर्क साधला होता. नोएडा पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. पोलिसांनी एल्विशची सुटका केली आहे, मात्र हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे.

  • नाम के साथ बदनामी भी आती हैं जलने वाले भी बढ़ते है और मैं हैरान नहीं होऊँगा की आने वाले टाइम में मुझपे और भी इल्ज़ाम लगेंगे। मुझे भगवान पे पूरा भरोसा है श्री राम जी पे भरोसा है। ये टाइम भी जल्दी बीतेगा 🙏🏻

    — Elvish Yadav (@ElvishYadav) November 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एल्विश यादवनं केलं ट्विट : एल्विश यादवनं सापाच्या विषावर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान एक्सवर ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे. त्यानं ट्विटमध्ये लिहलं, 'नावाबरोबरच बदनामी होते, द्वेष करणारे लोकही वाढतात आणि भविष्यात माझ्यावर आणखी आरोप होतील यात मला आश्चर्य वाटणार नाही. माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे आणि श्रीरामजींवर श्रद्धा आहे. ही वेळही लवकरच निघून जाईल. रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाच्या वादामुळं एल्विश यादवची चौकशी होत आहे. याआधी त्यानं एक व्हिडिओ बनवला होता आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये त्यानं आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं सांगितलं होतं.

रेव्ह पार्टी प्रकरण : 2 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी पाच जणांना अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विश यादवनं नोएडामधील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित रेव्ह पार्टीमध्ये बेकायदेशीरपणे सापाच्या विषाचा वापर केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छाप्यात पाच कोब्रा आणि सापाच्या विषासह नऊ साप जप्त करण्यात आले आहेत. यामुळे एल्विशवर रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याचा आणि त्यात सापाचे विष वापरल्याचा आरोप केला जात आहे. सूरजपूर न्यायालयाचे ज्येष्ठ वकील देवेंद्र राहुल यांनी सांगितले की, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत केलेल्या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षांची शिक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Anushka Sharma on Virat Kohli : 'विराट' खेळीनंतर नवऱ्यासाठी अनुष्का शर्माची खास पोस्ट; बर्थडे पर खुद को...
  2. Randeep and Lin Wedding: रणदीप हुड्डा लवकरच करणार गर्लफ्रेंड लिन लैश्रामशी लग्न
  3. Singham Again: 'सूर्यवंशी' या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अक्षय कुमारचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.