मुंबई - बॉलिवूड निर्माता आदित्य चोप्रा याने नेटफ्लिक्सवरील डॉक्यूमेंट्री द रोमँटिकमध्ये बॉलिवूडवर होणाऱ्या नेपोटिझमच्या विषयावर खुलासा केला आहे. त्याने यात मान्य केले की जर एखाद्याचा जन्म चित्रपट क्षेत्रातील कुटुंबात झाला असेल तर त्यांना ऑडिशन किंवा ब्रेक मिळणे नेहमीच सोपे जाऊ शकते. पण ते तेवढ्या पुरतेच मर्यादित असते. त्याचा भाऊ उदय चोप्राच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीचा संदर्भ देताना, आदित्य म्हणाला की, 'व्यक्तीची विशेषाधिकारप्राप्त किंवा सामान्य पार्श्वभूमी काहीही असली तरी कोण स्टार होईल हे प्रेक्षकांनीच ठरवले आहे.' तो पुढे म्हणाला की, 'यशराज फिल्म्सने अनेक नवोदित कलाकारांना लाँच केले आहे, तरीही, तो एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मुलगा उदय चोप्रा याला स्टार बनवू शकला नाही, कारण शेवटी, हे सर्व प्रेक्षकांच्या आवडी निवडीवर अवलंबून असते.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'लोक ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यापैकी एक म्हणजे विशेषाधिकारप्राप्त पार्श्वभूमीतून आलेली प्रत्येक व्यक्ती खात्रीशीरपणे यशस्वी होत नाही. मी इतर लोकांचा उल्लेख न करता ते स्पष्ट करू शकतो. मी फक्त माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा उल्लेख करून ते स्पष्ट करतो. माझा भाऊ एक अभिनेता आहे, पण तो फारसा यशस्वी अभिनेता नाही, असे आदित्य चोप्रा डॉक्युमेंटरीमध्ये म्हणाला.' तो पुढे म्हणाला की, 'तो बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मात्यांपैकी एकाचा मुलगा आहे. तो एका मोठ्या चित्रपट निर्मात्याचा भाऊ आहे. कल्पना करा की यशराज फिल्म्ससारख्या कंपनीने इतक्या नव्या कलाकारांना लॉन्च केले आहे, पण आम्ही उदयला स्टार बनवू शकलो नाही. हे घडण्याचे कारण काय तर आपल्याला कोणता कलाकार आवडतो हे फक्त प्रेक्षक ठरवतात, आणखी कोणीही नाही.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आदित्य चोप्रा पुढे म्हणाला, 'हे खरं आहे की जर तुमचा जन्म चित्रपट व्यवसायातील कुटुंबात झाला असेल तर ऑडिशन किंवा ब्रेक मिळणे सोपे जाईल यात शंका नाही. पण ते तेवढ्यापुरतेच मर्यादित असते.' एक अभिनेता म्हणून उदय चोप्राने मोहब्बतें चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर धूम चित्रपट मालिका आणि मेरी यार की शादी है यासारखे काही हिट चित्रपटही केले. पण त्यानंतर मात्र त्याचे प्यार इम्पॉसिबल आणि नील 'एन' निक्की सारखे चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरले आणि बॉक्स ऑफिसवर आपटले.
डॉक्युमेंट्रीमध्ये उदय चोप्राने त्याच्या डेब्यू चित्रपटाबद्दल आणि अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभवाबद्दलही सांगितले. 'जेव्हा धूम चित्रपटात काम करत होतो तेव्हाही मी मुख्य प्रवाहातील अभिनेता होण्याचा प्रयत्न करत होतो. मी अलीचे उदाहरण म्हणून घेतले पाहिजे आणि त्यानंतर तशा भूमिका केल्या पाहिजेत,' असे उदय चोप्रा म्हणाला.
उदयने पुढे सांगितले की, 'धूम नंतर त्याला अनेक ऑफर मिळाल्या पण त्याने त्या नाकारल्या कारण तो आपली एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.' त्याच्यावर झालेल्या घराणेशाहीच्या टीकेवर बोलताना उदय म्हणाला, 'मी जेव्हा चित्रपटात अभिनय करायला लागलो तेव्हा मी खूप साधाभोळा होतो. प्रत्येकाला मी आवडेल असे मला वाटले होते. लोक मला पसंत करणार नाहीत याची कधीही कल्पनाही केली नव्हती. माझ्यावर याचा मोठा परिणाम झाला.'
आदित्य चोप्राला वाटते की, तो प्रेक्षकांना विनोदी भूमिकांमध्ये खूप आवडला होता, परंतु त्याला स्वतःला अशा भूमिका करायच्या नव्हत्या. 'प्रेक्षकांना तो कॉमेडीमध्ये आवडायचा, पण त्याला कॉमेडीयन व्हायचे नव्हते. कदाचित त्याला स्वतःहून कळले असेल की आपण यासाठी योग्य नाही. कारण यशस्वी अभिनेता होण्यासाठी हे पुरेसे नाही,' असे निर्माता आदित्य चोप्रा म्हणाला.
अभिनेता उदय चोप्रा आज एक निर्माता म्हणून कार्यरत आहे. अभिनेता होण्याचे स्वप्न त्याच्यासाठी अपुरे राहिले आहे. आता तो अभिनय करेल पण यातच आपली कारकिर्द घडेल यावर तो ठाम नाही.