ETV Bharat / entertainment

Adipurush emotional scenes:आदिपुरुषच्या भावनिक दृष्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवणार प्रभास आणि क्रिती सेनॉन - आदिपुरुष रिलीज तारीख

प्रभास आणि क्रिती सेनॉनचे चाहते निराश होणार नाहीत कारण त्यांच्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटातील या जोडींची अनेक हटके दृश्ये आहेत. आदिपुरुषचे एडिटर आशिष म्हात्रे म्हणाले की, प्रभास आणि क्रिती यांच्या उपस्थितीने चित्रपटातील भावनिक दृष्ये खूपच सुंदर बनली आहेत.

Adipurush emotional scenes
Adipurush emotional scenes
author img

By

Published : Feb 22, 2023, 5:36 PM IST

हैदराबाद - आदिपुरुष टीझरवर तीव्र प्रतिक्रिया मिळाल्यानंतर, प्रभास आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रमोशनल कंटेंटचे लॉन्चिंग पुढे ढकलले आहे. मात्र चित्रपटाची टीम आता जूनमध्ये आदिपुरुषच्या रिलीजसाठी मुख्य जोडीवर पूर्ण विश्वास बाळगून असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

चित्रपट आणि प्रमुख जोडीवर नव्याने विश्वास दाखवून तयार असल्याचे दिसते. प्रचंड ट्रोलिंग दरम्यान, आदिपुरुष टीझर ड्रॉप झाल्यानंतर प्रभास आणि क्रितीची ऑनस्क्रीन जोडी ही एकमेव गोष्ट होती ज्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. या दोघांनी त्याच्या अवतीभवती इतकी चर्चा रंदू दिली की काही लोकांनी दोघांच्यात डेटिंग चालू असल्याच्या अफवा पसरेपर्यंत चालू राहिली. अजूनही काहीजण या चर्चेतून बाहेर पडायला तयार नसतात.

आदिपुरुष एडिटर आशिष म्हात्रे यांनी व्हीएफएक्स बाजूला ठेवून, प्रभास आणि क्रितीचे एकत्र दृश्य हे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वापरण्यास सुरूवात केलीा आहे. टिझरला तुफान ट्रोलचा सामना करावा लागल्यानंतर चित्रपटाच्या टीमने यातील व्हिएफएक्स नव्याने बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रावणाच्या लूकपासून ते अनेक महत्त्वाची दृष्ये पुन्हा बनवली जात आहेत व वादात अडकणार नाहीत याची पूर्ण काळजी घेऊन एडिट केली जात आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

प्रभास आणि क्रिती सेनॉनच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल बोलताना, आशिषने एका वेबलॉइडला सांगितले की, आदिपुरुषमध्ये प्रभास आणि क्रिती एकत्र किती छान दिसतात याचे वर्णन करण्यासाठी त्याच्याकडे शब्द कमी आहेत. या दोघांबद्दल बोलताना आशिष पुढे म्हणाला की, प्रभास आणि क्रितीमध्ये अनेक भावनिक सीक्वेन्स आहेत जे प्रेक्षकांच्या मनाला भिडतील. त्यांच्या मते, अफवा पसरवणाऱ्या लव्हबर्ड्सच्या केमिस्ट्रीने आदिपुरुषमधील भावनिक भारित दृश्यांना उंचावले आहे.

आदिपुरुष हा चित्रपट या वर्षी जानेवारीमध्ये चित्रपट गृहात येणार होता आता १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ओम राऊत यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. प्रभास आणि कृती यांच्या शिवाय आदिपुरुष चित्रपटात सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे तर सैफ अली खान अंतिम पौराणिक राक्षस - रावण ही व्यक्तीरेखा साकारत आहे. हा चित्रपट टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार आणि रेट्रोफिल्स यांनी संयुक्तपणे बँकरोल केला आहे ज्याचे मालक ओम आणि प्रसाद सुतार आहेत.

हेही वाचा - रांगड्या भाऊसाहेब शिंदेचा आक्रमक लुक रौंदळच्या ट्रेलरचं मुख्य आकर्षण!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.