ETV Bharat / entertainment

Adipurush box office Day 1: प्रभास स्टारर आदिपुरुषच्या कमाईची दमदार सुरुवात - ट्रेड रिपोर्ट्सनुसार आदिपुरुष

समीक्षकांचे मते व प्रेक्षकांनी दिलेले अभिप्राय नकारात्मक असूनही प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर आदिपुरुष यावर्षीचा सर्वात मोठा बॉक्स ऑफिस ओपन ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १४० कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे.

Adipurush box office Day 1
आदिपुरुषच्या कमाईची दमदार सुरुवात
author img

By

Published : Jun 17, 2023, 12:36 PM IST

मुंबई - बाहुबली स्टार प्रभास आणि क्रिती सेनॉन याच्या प्रमुख भूमिका असलेला पौराणिक विषयावरचा आदिपुरुष चित्रपट १६ जून रोजी भारतासह जगभर धुमधडाक्यात रिलीज झाला. या चित्रपटाला अपेक्षित रिव्ह्यू मिळाले नसले तरी बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी तुफान कमाई झाली आहे. प्रभासचे चाहते त्याला प्रभू रामचंद्राच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, खराब लिखाण आणि न पटणारे व्हीएफएक्ससाठी अशा कुमकुवत बाजू असतानाही प्रभासचे चाहते सिेमा पाहण्यात उत्सुकता दाखवत आहेत.

ट्रेड रिपोर्ट्सनुसार आदिपुरुष चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हिंदी आवृत्तीने ३६ ते ३८ कोटींची कमाई केली. इतर भाषेतील चित्रपटाने भारतात ९० कोटी रुपयांची नेट कमाई केलीय. व्यापार विश्लेषकांच्या मते ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाची जगभरातील कमाई त्याच्या पहिल्या दिवशी 140 कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन आणि लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान आणि लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आहेत. टी सिरीजने बँकरोल केलेला आदिपुरुष चित्रपट ५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. भव्य बजेट आणि प्रभावी स्टार कास्ट असलेल्या या चित्रपटात भगवान हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागे यांच्या तोंडी असलेल्या 'टपोरी' भाषेतील संवाद व चित्रपटात वापरण्यात आलेल्या व्हिएफएक्सवर प्रेक्षक आणि समीक्षक टीका करताना दिसत आहेत.

सुरुवातीच्या दिवशी आदिपुरुष पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यामुळे प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग समीक्षकांचे मते व प्रेक्षकांनी दिलेल्या अभिप्रायामुळे चित्रपट पाहायचा का नाही या संभ्रमात पडला आहे. मल्टिप्लेक्स थिएटर्सची देशभरातील साखळी आणि सिंगल स्क्रीन्समध्ये लोकांच्या गर्दीचा विचार केल्यास, पठाण आणि द केरळ स्टोरी नंतर आदिपुरुष या यंदाच्या वर्षीचा तिसरा चित्रपट आहे ज्याने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यश मिळवलंय.

प्रतिक्रिया आणि इतर चर्चा बाजूला ठेवून विचार केला तर देशभरात हिंदी, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणारा आदिपुरुष हा चित्रपट या वर्षीचा तिसरा सर्वात मोठा ओपनर ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

१. Tiger Shroff : टायगर श्रॉफने सोशल मीडियावर केला डान्सचा व्हिडिओ शेअर

२. Zhzb Box Office Collections Day 14 : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची 14 व्या दिवशी मंदावली बॉक्स ऑफिसवर कमाई

३. Katrina Vicky Airport Video : कॅटरिना कैफ आणि विक्की कौशलसोबत गप्पा मारताना आलिया झाली स्पॉट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.