ETV Bharat / entertainment

Adipurush Box Office Collection Day 21: 'आदिपुरुष' चित्रपट लवकरच जाणार पडद्याआड...

प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट आदिपुरुषला बॉक्स ऑफिसवर तीन आठवडे पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या कमाईत सध्याला बॉक्स ऑफिसवर काहीच भर पडत नाही आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच पडद्याआड होऊ शकतो.

Adipurush Box Office Collection
आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By

Published : Jul 7, 2023, 1:48 PM IST

मुंबई : प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट आदिपुरुषने बॉक्स ऑफिसवर तीन आठवडे पूर्ण केले आहेत. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि ६ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाची स्थिती बिघडली. या आठवड्याचे कलेक्शन बघून ओळखू येत आहे की या चित्रपटामुळे किती प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची खूप निराशा केली आहे. तसेच आदिपुरुष चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड विरोध झाला. आदिपुरुष चित्रपटामुळे बॉलीवूड चित्रपटावरही नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर काही काळानंतर ही बंदी हटविण्यात आली होती. या चित्रपटाला सोशल मीडियावर फार ट्रोल करण्यात आले होते. आता देखील या चित्रपटाला विरोध होताना आपण बघू शकतो. हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात फार कमी प्रेक्षक जात आहे. दरम्यान २१व्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आणि या तीन आठवड्यांत चित्रपटाची एकूण कमाई किती झाली हे आपण बघूया.

२१व्या दिवसाची कमाई : आदिपुरुषच्या निर्मात्यांनी या चित्रपटाकडून सर्व आशा गमावल्या आहेत. चित्रपटाच्या ग्राफिक्सपासून ते संवादांपर्यंत या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातले आहे. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मनोज मुंतशीर यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. चित्रपटाने अद्याप देशातच ३०० कोटींचा टप्पा ओलांडलेला नाही, तर चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ८८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत फार घसरण झाली.

आदिपुरुष लवकरच पडद्यावरून हटवल्या जाणार : त्याचबरोबर हा चित्रपट आता गेल्या अनेक दिवसांपासून सुमारे २० ते २५ लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. २१ व्या दिवशी या चित्रपटाने अंदाजे २५ लाखाची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४६० कोटींच्या जवळपास आहे. ओम राऊत यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी ६०० कोटी रुपयांचे मोठे बजेट खर्च केला. मात्र आतापर्यत या चित्रपटाने जो लागलेला खर्च आहे तो देखील वसूल केला नाही आहे. आता या चित्रपटाबद्दल असे बोलले जात आहे की हा चित्रपट लवकरच पडद्यावरून हटवला जाईल, कारण या चित्रपटाबाबत चित्रपट निर्मात्यांच्या सर्व आशा या मावळल्या आहेत. त्यामुळे काही दिवसात हा चित्रपट पडद्याआड दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. SPKK box office collection day 8 : रिलीजच्या 8व्या दिवशी 'सत्यप्रेम की कथा'च्या कमाईत घसरण...
  2. Angira Dhar IMDb Breakout Star : अंगिरा धरला बनली वर्षातील दुसरी ब्रेकआउट स्टार, आयएमडीबीची घोषणा
  3. Sushmita Sen : सुष्मिता सेनने आपल्या मुलीसोबत आयफेल टॉवरसमोर केला डान्स...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.