ETV Bharat / entertainment

Adipurush box office collection day 12: रूपेरी पडद्यावर 'आदिपुरुष' चित्रपटाची वाईट परिस्थिती

प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर 'आदिपुरुष' चित्रपट कमाईच्या बाबतीत रूपेरी पडद्यावर संघर्ष करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कमाईत घरसण होताना दिसत आहे. निर्मात्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ जाताना दिसत आहेत.

Adipurush box office collection day 12
आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12
author img

By

Published : Jun 28, 2023, 11:34 AM IST

मुंबई : प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाला अजून दोन आठवडेही पूर्ण झाले नाहीत आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संपत असल्याचे दिसत आहे. 'आदिपुरुष' चित्रपटगृहात चालू आहे, मात्र या चित्रपटाला बघायला फार कमी प्रेक्षक येत आहे. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटावरील प्रेक्षकांचा संताप अद्याप संपलेला नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना रामायणाच्या नावाखाली मूर्खपणाची निर्मिती केल्याबद्दल चौफेर टीकेला सामोरे जावे लागत आहे. प्रेक्षक चित्रपट निर्मात्यांना फार शिव्या सोशल मीडियाद्वारे देत आहे. चित्रपटाच्या कुरूप संवाद आणि वाईट व्हिएफएक्समुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटापासून फार अपेक्षा होत्या, मात्र त्यांच्या अपेक्षेवर हा चित्रपट उतरू शकला नाही आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की, या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत संघर्ष करवा लागत आहे. सध्याला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी करत आहे. आता या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस कमी होत आहे. आता या १२ दिवसात चित्रपटाने किती कमाई केली. तसेच १२व्या दिवशी चित्रपटाने किती कमाई झाली, चला पाहुया....

आदिपुरुषाची बाराव्या दिवसाची कमाई : आदिपुरुषने पहिल्या दिवशी देशांर्तगत ८८ कोटींचा व्यवसाय केला होता आणि आता १२व्या दिवशी चित्रपटाने केवळ १.९० कोटी (अंदाजे) कमावले आहेत. या चित्रपटाने आदल्या दिवशी 2 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यामुळे आता देशांर्तगत चित्रपटाचे एकूण कलेक्शनने २७९ कोटींचा आकडा पार केला आहे आणि जगभरातील कलेक्शन ४५० कोटींहून अधिक आहे.

आदिपुरुष या चित्रपटाची तिकीट कमी दरात : दरम्यान हा चित्रपट दुसऱ्या वीकेंडला पोहोचला आहे, पण चित्रपटाची कमाई पाहता आगामी वीकेंडमध्ये हा चित्रपट काही करिष्मा करेल असे वाटत नाही. चित्रपटाच्या तिकिटाची किंमत ११२ रुपयांपर्यंत करण्यात आली आहे, तरीही प्रेक्षक हा चित्रपट बघायला जाण्याचे टाळत आहे. यापूर्वी तिकीटाची किंमत १५० रुपये होती, मात्र सध्याला निर्मात्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात आहेत.

हेही वाचा :

  1. RRR Director Rajamouli : एसएस राजामौली तामिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसले
  2. Kareena Kapoor enjoying vacation : करीना कपूर आणि तिच्या कुटुंबाने लुटला उन्हाळी सुट्टीचा आनंद
  3. Suhana Khans untitled action thriller : शाहरुखची लेक सुहानाच्या अ‍ॅक्शन थ्रिलरचे सुजॉय घोष करणार दिग्दर्शन? वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.