ETV Bharat / entertainment

हसरत जयपुरी यांचा नातू आदिल जयपुरी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

author img

By

Published : Nov 10, 2022, 4:22 PM IST

प्रसिद्ध गीतकार हसरत जयपुरी यांचा नातू आदिल जयपुरी त्याच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडिया सेन्सेशन काशिका कपूर ‘साजन’ या रोमँटिक गाण्यात आदिल जयपुरीसोबत दिसणार आहे.

हसरत जयपुरी यांचा नातू आदिल जयपुरी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज
हसरत जयपुरी यांचा नातू आदिल जयपुरी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

मुंबई - सोशल मीडिया सेन्सेशन काशिका कपूर ‘साजन’ या रोमँटिक गाण्यात आदिल जयपुरीसोबत दिसणार आहे. हे गाणे दिव्यांश पंडित दिग्दर्शित करत असून मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अंकित तिवारी, आदिल जयपुरी, काशिका कपूर आणि दिव्यांश पंडित यांच्या उपस्थितीत सिंगल साजन लाँच करण्यात आले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अंकित तिवारीने गायलेले, 'साजन' हे एक आकर्षक रोमँटिक सिंगल आहे आणि अवनीतने संगीतबद्ध केले आहे. गाण्याचा व्हिडिओ एका सर्वनाशामुळे प्रभावित झालेल्या जगात चित्रित करण्यात आला आहे - जिथे मानव मानव-भक्षक (झोम्बी) बनत आहेत आणि इतरांना मारण्यासाठी आणि शहराचा नाश करण्यासाठी कूच करत आहेत. व्हिडिओमध्ये आदिल जयपुरी आणि काशिका कपूर हे एका प्रेमळ जोडप्याच्या भूमिकेत आहेत. जगाचा अंत होत असताना, आदिलची एकच इच्छा आहे की तिला कोणत्याही क्षणी झोम्बी बनवणाऱ्या विषाणूची लागण झाली असताना तिच्यासोबत प्रेमाचे शेवटचे नृत्य करावे. त्याची सदैव तिच्यासोबत राहण्याची इच्छा आहे पण जर ते शक्य नसेल तर त्याच्याकडे एक शेवटचा पर्याय आहे. वाइल्ड बफेलोज एंटरटेनमेंटने या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे आणि दिव्यांश पंडित, चित्रपट निर्माता आणि संगीत लेबलचे संस्थापक दिग्दर्शित आहे.

आदिल जयपुरी हे दिग्गज गीतकार हसरत जयपुरी यांचे नातू आहेत, ज्यांनी 'बदन पे सितार लपते हुए', 'जिंदगी एक सफर है सुहाना', 'जाने कहां गए वो दिन', 'सुन साहिबा सुन', 'बहारों फूल' ही सदाबहार गाणी रचली होती. आदिल जयपूरी हा आपली अभिनयाची कार्किर्द सुरू करत आहे.

हेही वाचा - रणबीर कपूरने आलिया व लेकीसह केला गृहप्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.