मुंबई - सध्याच्या तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या कुप्रसिद्ध ब्लू व्हेल गेमवर आधारित द गेम ऑफ गिरगीट या आगामी थ्रिलरमध्ये अभिनेत्री अदा शर्मा अभिनेता श्रेयस तळपदेसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. जगभरातील तरुण या गेमकडे सतत आकर्षित झाले आणि गेमशी संबंधित असलेल्या ब्लू व्हेल चॅलेंजमुळे झालेल्या असंख्या धोकादायक घटना आणि मृत्यूमुळे हा चर्चेचा मुख्य मुद्दा बनला.
पोलिसाच्या भूमिकेत अदा शर्मा - तिच्या भूमिकेबद्दल बोलताना अदा शर्मा म्हणते, 'द गेम ऑफ गिरगीटमध्ये मी भोपाळमधील एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ब्लू व्हेल अॅप नावाच्या अॅपवर आधारित आहे. अॅपवरील गेम्समधून वेगवेगळे टास्क दिले जातात व सततच्या कार्यातून तुम्ही स्वतःला झोकून देता. यासाठी तुम्ही स्वतःला संपवता किंवा दुसऱ्यांना, अशा प्रकारे एकदा यात तुम्ही अडकला की परत फिरण्याचा मर्ग उरलेला नसतो. हे प्रकरण मी पोलीस ना नात्याने सोडवत असते.'
'कमांडोमध्ये मी याआधी पोलिसाची भूमिका केली आहे. या चित्रपटात साकारलेली भावना रेड्डी खूप लोकप्रिय झाली. सध्या करत अलेल्या चित्रपटातील गायत्री भार्गव ही खूप वेगळी पोलिस आहे. पोलिसाची भूमिका करण्यात मजा आहे पण यावेळी वेगळी आहे,'असे ती पुढे म्हणाली.
खलनायकाच्या भूमिकेत श्रेयस तळपदे - या चित्रपटाविषयी बोलताना नायक श्रेयस तळपदे म्हणाला, 'चित्रपटाचे कथानक अतिशय मनोरंजक आहे आणि त्यामुळेच मला चित्रपटाशी जोडले गेलो आहे. 'गेम ऑफ गिरगीट'चे दिग्दर्शन विशाल पांड्या करत आहेत आणि मी या प्रवासाची वाट पाहत आहे.'
संदेश देणारा चित्रपट - थ्रिलरमध्ये एक शक्तिशाली संदेश देखील आहे जो प्रेक्षकांपर्यंत, विशेषत: देशातील लहान मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे असे आम्हाला ठामपणे वाटते. या चित्रपटात अदा शर्मा अत्यंत अपारंपरिक भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना विशाल पुढे म्हणाला, 'गिरगिटचा गेम ही आजच्या पिढीची कथा आहे जिथे लहान मुलांनी मोबाईलवर फ्रेंडशिप अॅप्सचा अवलंब करून त्यांचे मित्र बनवले आहेत. इथ झालेल्या मित्रांशी ते त्यांचे सर्व खासगी आयुष्य शेअर करतात आणि त्यामुळे ते कोणत्या खाईत कोसळतात हे त्यांनाच कळत नाही.'
श्रेयस आणि अदामध्ये होणार टक्कर - श्रेयस तळपदे एका अॅप डेव्हलपरच्या भूमिकेत आहे जो या असुरक्षित मुलांचा फायदा घेतो आणि अदा एक पोलिस आहे, जी मुलांच्या आत्महत्यांच्या प्रकरणांची चौकशी करते आणि तिची स्वतःची मुलगी या गेमला बळी पडते. त्यामुळे तिचे गिरगिटला पकडण्याचे आव्हान व्यावसायिक नसून आता वैयक्तिक झाले आहे.
हेही वाचा - Virat Kohli Pokes Fun : विराट कोहलीचा मौके पर छक्का, अनुष्कासह पापाराझींमध्ये खळखळाट