मुंबई : 'द केरळ स्टोरी'ने सर्व वाद आणि निर्बंधांना तोंड देत बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने आतापर्यंत 206.97 कोटींचे कलेक्शन केला आहे. बॉक्स ऑफिसवर द्विशतक झळकावल्यानंतर, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने दावा केला आहे की 'द केरळ स्टोरी' हा भारतातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला महिला नेतृत्वाचा चित्रपट ठरला आहे. याबद्दल तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आभाराची पोस्टही शेअर केली आहे.
२०० कोटी कमावणारा पहिला फिमेल लिड चित्रपट : अदा शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे, 'आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी अनपेक्षित असतात. कारण मला कुठल्याच अपेक्षा नव्हत्या. असे केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार. 'द केरळ स्टोरी'चे निर्माते- विपुल सर ज्यांनी स्टुडिओच्या कोणत्याही पाठिंब्याशिवाय आणि कमांडोमध्ये भावना रेड्डीची भूमिका साकारणाऱ्या आणि शालिनी उन्नीकृष्णन या मुलीवर विश्वास ठेवून हा चित्रपट बनवण्यासाठी मोठी जोखीम पत्करला. सुदिप्तो सरला आपल्या संशोधनावर 7 वर्षे अडथळे असतानाही ते यासाठी उभे राहिले. चित्रपटाच्या सेटवर ते आम्हा सर्वांशी दयाळू होते आणि सर्व वेदर कंडीशन्स, ट्रायल्स आणि संकटांमध्ये त्यांनी आनंददायी वर्तन राखले.' पोस्टर व्यतिरिक्त, अदाने तिच्या पोस्टमध्ये आणखी काही फोटोना शेअर केले आहे, ज्यामध्ये 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन हे दोघे ही दिसत आहे. तर, पुढील फोटोंमध्ये अदा काही मुलींसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे.
राज्यात बंदी : केरळ स्टोरीने रिलीजच्या दोन आठवड्यांनंतर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 203.47 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घसरण झाली असली तरी या चित्रपटाने 'ऑल टाइम ब्लॉकबस्टर'चा दर्जा प्राप्त केला आहे. रिलीजच्या 19 व्या दिवशी या चित्रपटाने 3.50 कोटींची कमाई केली, त्यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 206.97 कोटी रुपये झाले आहे. काही राज्यत या चित्रपटावर बंदी असतांनाही 'द केरळ स्टोरी'ने इतकी जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.
हेही वाचा : Ravrambha Movie Premiere : 'रावरंभा'च्या प्रीमियरला लोटली चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी!