ETV Bharat / entertainment

ADAH SHARMA HOSPITALISED : फूड ऍलर्जी आणि डायरियामुळे अदा शर्मा रुग्णालयात दाखल... - अदा शर्मा रुग्णालयात दाखल

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला फूड ऍलर्जी आणि डायरिया झाल्याचे समजत आहे. तिच्या आगामी कमांडो मालिकेचे प्रमोशन सुरू असताना तिला आजारपणाने गाठले आहे.

ADAH SHARMA
अदा शर्मा
author img

By

Published : Aug 2, 2023, 6:19 PM IST

मुंबई : 'द केरळ स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या ती 'कमांडो' मालिकेमुळे चर्चेत आहे आणि लवकरच ही मालिका ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी, अदा शर्मा आणि मालिकेतील मुख्य अभिनेता प्रेम पारिजा यांच्यासोबत प्रमोशनमध्ये ती सहभागी होण्यास सज्ज होती, मात्र प्रमोशनच्या दिवशी सकाळी तिची तब्येत बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. फूड ऍलर्जी आणि डायरियामुळे तिला हॉस्पिटलमध्ये जावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी तिची बिघडलेली तब्येत आणि तिला रुग्णालयात दाखल करण्याची माहिती शेअर केली आहे.

अदा शर्मा झाली आजारी : अदा शर्माच्या तब्येत बिघडल्यानंतर निर्मात्यांनी सांगितले की, 'कमांडो' या मालिकेच्या प्रमोशनसाठी जाण्यापूर्वी मंगळवारी सकाळी अदा आजारी पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये जावे लागले, तिला फूड अ‍ॅलर्जी आणि डायरिया झाला आहे. त्याचबरोबर मालिकेच्या प्रमोशन इव्हेंटसाठी ती कधी पोहोचणार याची माहिती सध्या शेअर करण्यात आलेली नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'द केरळ स्टोरी' : अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन अंदाजे २३८.४७ कोटी रुपयांची कमाई केले. हा चित्रपट पाहण्यासाठी खूप गर्दी चित्रपटगृहांमध्ये होत होती. या चित्रपटात कुठलाही हिरो नसताना या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक इतिहास रचला. आजही हा चित्रपट प्रेक्षक खूप आवडीने पाहत आहेत.

कमांडो मालिकेबद्दल : दरम्यान यापूर्वी 'कमांडो' या मालिकेचा एक दमदार ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये अदा शर्मा अ‍ॅक्शन करताना दिसत होती. या मालिकेत ती भावना रेड्डी नावाच्या महिला एजंटची भूमिका साकारत आहे. ही एक अ‍ॅक्शन-थ्रिलर मालिका आहे, ज्यातून प्रेम पारिजा पदार्पण रूपेरी पडद्यावर करणार आहे. या मालिकेत प्रेम आणि अदा यांच्यासोबत अमित सियाल, तिग्मांशु धुलिया आणि मुकेश छाबरा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'द केरळ स्टोरी' नंतर विपुल अमृतलाल शाह यांनी पुन्हा एकदा अदा शर्माला त्यांच्या प्रोजेक्टमध्ये घेतले आहे. ही मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Oh My God 2 Trailer Postponed : नितीन देसाईच्या निधनामुळे 'ओह माय गॉड २'चा ट्रेलर लांबणीवर
  2. Baap Manus trailer : बाप हा आई नसतो कारण तो 'बाप' असतो, 'बाप माणूस'चा ट्रेलर रिलीज
  3. Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरला चाहत्याने केले प्रपोज, पाहा पुढे काय घडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.