हरिद्वार - Sonali Bendre celebrated New Year : देशभरात नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले. दरम्यान काही बॉलिवूड स्टार्सनं मोठ्या पार्ट्यांमध्ये जाऊन नवीन वर्ष साजरे केले. पण बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं उत्तराखंडमध्ये नवीन वर्ष साजरे केले असून आता तिनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोमध्ये सोनाली पती आणि मुलासोबत दिसत आहे. सोनालीचा वर्षाची सुरुवात करण्याचा मार्ग सर्वात अनोखा आहे. यावर्षी पार्टी सोडून तिनं अध्यात्माकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.आज सोनालीचा वाढदिवस आहे, त्यामुळं तिच्या चाहत्यांसाठी हा खूप खास दिवस आहे. ती आज तिचा 49वा वाढदिवस साजरा करत आहे.
सोनाली बेंद्रेनं शेअर केले फोटो : सोनाली बेंद्रे ही पती गोल्डी बहल आणि मुलगा रणवीर बहलसोबत हरिद्वारला पोहोचली. इंस्टाग्रामवरील शेअर केलेल्या फोटोंमध्ये, ती तिच्या मुलसोबत ई-रिक्षाची सफर करताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत तिघेही माता गंगेची आरती करत आहे. या फोटोवर तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''हरिद्वारमध्ये ई-रिक्षा, केबल कार राईड, सर्वात आश्चर्यकारक, गंगाजीच्या आरतीसह सुंदर दिवस आहे''. हरिद्वारला पोहोचल्यावर तिनं गंगा मातेची आरती केली. याशिवाय तिनं गंगेत स्नान देखील केलं. सोनालीनं हरिद्वारच्या रस्त्यावर कुटुंबासोबत ई-रिक्षाचा आनंद लुटला. तसेच तिचा नवीन वर्षात धार्मिक अवतार पाहून तिचे चाहते खूप खुश दिसत आहेत. काहीजण तिची प्रशंसा करताना सोशल मीडियावर दिसत आहेत. एका चाहत्यानं तिच्या या फोटोवर कमेंट करत लिहिल, ''खूप सुंदर फोटो आहेत''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''तुझा हा अंदाज खूप सुंदर वाटला''. अशा अनेक कमेंट्स या फोटोवर येत आहेत. याशिवाय काहीजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
सोनाली बेंद्रेचा पती आणि मुलगा : सोनाली बेंद्रेनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं 'हम साथ साथ हैं', 'जख्म', 'सरफरोश', 'दिलजले' चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला. सोनालीनं स्टेज 4 कॅन्सरशी झुंज दिली आहे. तिनं 12 नोव्हेंबर 2002 रोजी मुंबईत गोल्डी बहलसोबत लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगा आहे.
हेही वाचा :