ETV Bharat / entertainment

'हिंदी सिनेमा प्रगतीशील आहे, पुन्हा मजबूत होईल', अभिनेत्री काजोलला विश्वास - Kajol forward thinking

अभिनेत्री काजोलला वाटते की हिंदी चित्रपट उद्योग हा सर्वात "फॉरवर्ड थिंकिंग" आणि प्रगतीशील उद्योगांपैकी एक आहे आणि बॉलीवूड चित्रपट बॉक्स-ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नाहीत हा एक तात्पुरता काळ आहे.

काजोल
काजोल
author img

By

Published : Dec 1, 2022, 11:39 AM IST

मुंबई - अभिनेत्री काजोलला वाटते की हिंदी चित्रपट उद्योग हा सर्वात "फॉरवर्ड थिंकिंग" आणि प्रगतीशील उद्योगांपैकी एक आहे आणि बॉलीवूड चित्रपट बॉक्स-ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नाहीत हा एक तात्पुरता काळ आहे.

तिच्या आगामी 'सलाम वेंकी' या चित्रपटाच्या तयारीत असलेल्या या अभिनेत्रीने सांगितले की, हिंदी चित्रपट ज्या संघर्षाचा सामना करत आहेत तो केवळ बॉलिवूडपुरता मर्यादित नाही तर जगभरातील चित्रपटांचा आहे.

अभिनेत्रीने सांगितले: "माझा खरोखर विश्वास आहे की आमचा हिंदी चित्रपट उद्योग हा सर्वात पुढे जाणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे आणि आम्हाला यावर खूप पैसे लागलेले आहेत किंवा अनेक स्टेक होल्डर्स यात गुंतलेले आहेत म्हणून दुसरा पर्यय नाही असे नाही. फक्त हिंदी चित्रपटांनाच थिएटरमध्ये फटका बसलाय असे नाही तर जगभरातील चित्रपटांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा फटका सहन करावा लागला आहे.''

तिने पुढे नमूद केले की लोक गर्दीच्या ठिकाणी आणि सिनेमागृहांना भेट देण्याबाबत खूप सावध असतात. "मला वाटते की हा फक्त एक टप्पा आहे आणि आमचे चित्रपट लवकरच जोरदारपणे परत येतील. आम्ही, एक उद्योग म्हणून, त्यावर काम करत आहोत, गीअर्स बदलत आहोत आणि वैयक्तिक पातळीवर पुढे जाण्याचा मार्ग शोधत आहोत. मला खात्री आहे की वैयक्तिक ऊर्जा आणि प्रयत्न एकत्र येतील. आणि आमचा उद्योग पुन्हा रुळावर येईल," असेही ती म्हणाली.

रेवती दिग्दर्शित 'सलाम वेंकी' या चित्रपटात विशाल जेठवा, राहुल बोस, राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि आहाना कुमरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा - सैयामी खेर 'फाडू' मालिकेत साकारणार मराठमोळी भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.