चेन्नई - प्रसिद्ध अभिनेत्री मीना यांचे पती विद्यासागर यांचे मंगळवारी रात्री चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. विद्यासागर (वय 48 ) हे फुफ्फुसाच्या गंभीर संसर्गाने त्रस्त होते आणि या वर्षी मार्चमध्ये त्यांचे निदान झाल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
विद्यासागर यांना यापूर्वी कोविडचा त्रास झाला होता, पण ते बरे झाले होते. मंगळवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे पाहून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तब्येत बरी होऊ शकली नाही आणि सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 2 वाजता चेन्नईतील बेसंत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
विद्यासागर हे प्रसिद्ध अभिनेत्री मीना यांचे पती होते. त्यांचे 2009 मध्ये बेंगळुरूमध्ये लग्न झाले होते आणि त्यांना नैनिका तिला एक मुलगी आहे. मीनाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली आणि त्यानंतर 90 च्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली. तिने रजनीकांतसह दक्षिणेकडील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तीन दशकांहून अधिक काळ तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या मीनाने मोहनलालच्या 'दृश्यम' आणि कमल हसनच्या 'अववाई षणमुगी' यासह अनेक चित्रपटचातून भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा - शाहरुखच्या 'रईस'मध्ये झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानबद्दल जाणून घ्या...!