मुंबई - Imran khan : बॉलिवूड अभिनेता इमरान खान सध्या चर्चेत आला आहे. तो लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत असल्याचं समजत आहे. इमरान खाननं 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' या चित्रपटाच्या सेटवरची काही पडद्यामागील फोटो शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार दिसत आहे. ही फोटो 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा'च्या सेटवरील जुनी फोटो आहेत. हे थ्रोबॅक फोटो शेअर करत इमराननं कॅप्शनमध्ये लिहलं, 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' हा एक अवघड चित्रपट होता. या चित्रपटामध्ये मी गँगस्टर होतो. या चित्रपटाचं प्रमोशन मला चांगल्या प्रकारे करता आलं नाही. या चित्रपटात माझी भूमिका गुंडाची होती. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' चित्रपटाची कहाणी पूर्णपणे प्रेमकथेवर आधारित होती.
इमरान खानमध्ये काय लिहलं : 'मी चित्रपटाच्या रेट्रो व्हाइबबद्दल उत्सुक होतो. 80 च्या दशकातील चित्रपटामध्ये कसं लूक असायचं याबद्दल मी अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याकडून अनेक टिप्स घेतल्या. मला सुरुवातीला या चित्रपटाचं शूटिंग जानेवारी 2013 मध्ये पूर्ण करायचं होतं, पुढच्या महिन्यात मला 'गोरी तेरे प्यार में'चे शूटिंग सुरू करायची होती, पण हे शेड्यूल त्याच वर्षी ऑगस्टपर्यंत वाढलं. मी सेटवर शूटिंग करत होतो. रिलीज होताच या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अक्षय कुमार एक चांगला स्टार आहे, आणि खऱ्या आयुष्यात तो खूप मजबूत व्यक्ती आहे.
सोनाक्षीचं केलं कौतुक : सोनाक्षीबद्दल बोलताना त्यानं म्हटलं,'मला पहिल्या दिवसापासून सोनाक्षी खूप आवडते. ती एकदम बेधडक आहे. इमरान खान हा आमिर खानचा पुतण्या असून त्यानं 2008 मध्ये आलेल्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत जेनेलिया डिसूजा दिसली होती. त्यानंतर त्यानं दीपिका पदुकोणसोबत 'ब्रेक के बाद', कतरिना कैफसोबत 'मेरे ब्रदर की दुल्हन', करीना कपूर खानसोबत 'एक मैं और एक तू', अनुष्का शर्मासोबत 'मटरू की बिजली का मंडोला' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा :