मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपले सर्वस्व 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाला दिले आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी, अभिनेत्याच्या जवळच्या स्त्रोताने शेअर केले की चित्रपटातील दीर्घकाळ चाललेल्या सीनचे शूटिंग करताना त्याला गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, आमिरने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर शूट सुरू ठेवले.
धावताना होणारा त्रास टाळण्यासाठी त्याने फिजिओथेरपी घेतली आणि पेनकिलर घेतली आणि शुटिंग सुरू ठेवले. आमिरला एक मिनिटही वाया घालवायचा नव्हता कारण चित्रपटाचे शूटिंग आधीच कोरोना महामारीमुळे लांबले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अद्वैत चंदन दिग्दर्शित, 'लाल सिंग चड्ढा' हे अकादमी पुरस्कार विजेते 1994 च्या फॉरेस्ट गंप चित्रपटाचे अधिकृत हिंदी रूपांतर आहे, ज्यात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होते. यावर्षी 11 ऑगस्टला 'लाल सिंग चड्ढा' रिलीज होणार आहे.
करीना कपूर खान आणि मोना सिंग देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. काही आठवड्यांपूर्वी, आमिरने चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून लोक चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहेत. जवळपास 3 मिनिटांच्या ट्रेलरने चित्रपटाचा नायक लाल सिंग चड्ढाच्या आकर्षक आणि निरागस जगाची झलक पाहायला मिळाली होती.
ट्रेलरमध्ये, आमिरचा शांत आवाज आणि त्याचे डोळे आमि लूक राजकुमार हिरानीच्या 'पीके' मधील अभिनयाची आठवण करुन देणारा आहे. आमिरची करीनासोबतची सुंदर केमिस्ट्री छान आहे आणि मोना सिंग देखील नायकाच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे.
हेही वाचा - आयुष्मान खुरानाच्या फोटोवर कार्तिक आर्यनचे भन्नाट उत्तर