ETV Bharat / entertainment

Ira khan Pre Wedding Functions : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात - इरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे

Ira khan Pre Wedding Functions : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आयराच्या आता प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरूवात झाली आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब केळवण सोहळ्याचा आनंद घेताना दिसतंय.

Ira khan Pre Wedding Functions
आयरा खानचं प्री-वेडिंग फंक्शन्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:38 AM IST

मुंबई - Ira khan Pre Wedding Functions : अभिनेता आमिर खानची मुलगीआयरा खान तिच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे. ती लवकरच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. सध्या आयरा खानच्या प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरू झाली आहेत. काल आयरा आणि नुपूरच्या लग्नाची सुरुवात केळवण सोहळ्यानं झाली. या जोडप्यानं त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आयरा आणि नुपूर हे खूप खूश दिसत आहेत. आयरा खाननं नोव्हेंबर 2022 मध्ये बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली होती. आता हे जोडपे जानेवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

इरा खानच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला झाली सुरुवात : या जोडप्यासाठी काल केळवण सोहळा आयोजित केला होता आणि त्यासोबतच त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात देखील झाली आहे. आयराचा होणारा नवरा नुपूर हा महाराष्ट्रीयन आहे, त्यामुळे महाराष्ट्रीयन पद्धतीनं काही कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान केळवण समारंभात, वधू-वरांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि विवाहित जोडप्याला आशीर्वाद आणि भेटवस्तू देतात. महाराष्ट्रीयन लग्नातील हे एक महत्त्वाचं कार्य आहे. फोटोमध्ये आयरानं 'नोज रिंग'सह सुंदर गुलाबी-पांढरी लहरिया साडी परिधान केली आहे. यावर तिनं केस मोकळी सोडली आहे. या लूकवर तिनं लाईट मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या कार्यक्रमात तिच्यासोबत नुपूरचे नातेवाईक आणि आई रीना दत्ता देखील दिसत आहे. याशिवाय आयराची मैत्रिण अभिनेत्री मिथिला पालकरही फोटोत दिसत आहे.

इरा आणि नुपूर डेस्टिनेशन वेडिंग करेल : मिळालेल्या माहितीनुसार, आयरा आणि नुपूर 3 जानेवारी 2024 रोजी कोर्ट मॅरेज करणार आहेत. यानंतर ते डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपूरला जाणार आहेत. आयराचे वडील आमिर 13 जानेवारीला मुंबईत आपल्या मुलीच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन देणार आहेत. आमिर खानच्या मुलीच्या लग्नाचा सोहळा भव्य असणार आहे. रिसेप्शनसाठी आमिर स्वतः फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करणार आहे. पाहुण्यांच्या यादीत तरुण कलाकारांपासून ते ज्येष्ठ अभिनेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश असेल.

हेही वाचा :

  1. Uorfi Javed viral video : पोलिसांची बदनामी अंगलट, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल
  2. SRK dance on Jhoome jo pathaan : 'पठाण' आणि 'जवान'च्या गाण्यांवर जोरदार थिरकला बर्थडे बॉय शाहरुख खान
  3. Kangana Ranaut Visits Dwarkadhish: कंगना रणौतनं गुजरातेत जाऊन द्वारकाधीशला घातलं आशीर्वादासाठी साकडं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.