ETV Bharat / entertainment

आमिर खाने एसएस राजामौलीसह सेलेब्रिटींसाठी आयोजित केले 'लाल सिंग चड्ढा'चे स्पेशल स्क्रिनिंग - Special Screening of Lal Singh Chadha

लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग हैदराबादमध्ये तेलुगु सेलेब्रिटींसाठी आयोजित केले होते. यावेळी मेगास्टार चिरंजीवी, नागार्जुन, एसएस राजामौली, सुकुमार आणि नागा चैतन्य या कलाकारांनी आमिरसोबत हा चित्रपट पाहिला.

'लाल सिंग चड्ढा'चे स्पेशल स्क्रिनिंग
'लाल सिंग चड्ढा'चे स्पेशल स्क्रिनिंग
author img

By

Published : Jul 15, 2022, 10:45 AM IST

हैदराबाद - मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी लाल सिंग चड्ढाच्या रिलीजची प्रतीक्षा करीत आहे. त्याने या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग हैदराबादमध्ये तेलुगु सेलेब्रिटींसाठी आयोजित केले होते. यावेळी मेगास्टार चिरंजीवी, नागार्जुन, एसएस राजामौली, सुकुमार आणि नागा चैतन्य या कलाकारांनी आमिरसोबत हा चित्रपट पाहिला.

लाल सिंग चड्ढाला तेलगू चित्रपटातील व्यक्तींसोबत पाहत असल्याचा आमिरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. फोटोमध्ये दिसणारा नागा चैतन्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

लाल सिंग चड्ढा हा टॉम हँक्सची मुख्य भूमिका असलेल्या फॉरेस्ट गंप या इंग्रजी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. 11 ऑगस्टला अक्षय कुमारच्या रक्षाबंधनासोबत हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे प्रमोशन अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने सुरू आहे. या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. शुक्रवारी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना पसंत पडला असून आमिरचे चाहते रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत.

चिरंजीवी, नागार्जुन, एसएस राजामौली आणि सुकुमार यांच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया यायच्या बाकी असताना या चित्रपटाबद्दल आमिरने त्याच्या आईच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले आहे. ''माझ्या आईला चित्रपट खूप आवडला. ती म्हणाली, 'इतर कोणाचेही ऐकू नकोस, तू खूप चांगला चित्रपट बनवला आहेस. काहीही कट करू नकोस, जसा आहे तसा रिलीज करा'. माझ्या कामाबद्दल आईचे मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे,” असे आमिरने शेअर केले होते.

हेही वाचा - ललित मोदीची सुष्मिता सेनसोबत 9 वर्षांची ट्विटर एक्सचेंज व्हायरल, डेटिंगचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.