ETV Bharat / entertainment

''मी जर कुणाचे मन दुखावले असेल तर मला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटते'' - आमिर खान - Lal Singh Chadha Release

बॉयकॉट लाल सिंग चड्ढा हा ट्विटरवर ट्रेंड ही मंडळी चालवत आहेत. अशावेळी पहिल्यांदाच आमिरने यावर मौन सोडले आहे आणि मी जर कुणाचे मन दुखावले असेल तर मला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटते, असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आमिर खान
आमिर खान
author img

By

Published : Aug 10, 2022, 3:32 PM IST

नवी दिल्ली - आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट रिलीजच्या उंबरठ्यावर आहे. अशावेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम खूप मेहनत घेत आहे. दरम्यान आमिर खानचे जुने विधान खोदून काढून त्याच्यावर टीका करणाऱ्यांची एक ट्रोलर्सची फौज कार्यरत झाली आहे. बॉयकॉट लाल सिंग चड्ढा हा ट्विटरवर ट्रेंड ही मंडळी चालवत आहेत. अशावेळी पहिल्यांदाच आमिरने यावर मौन सोडले आहे आणि 'मी जर कुणाचे मन दुखावले असेल तर मला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटते', असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशनच्यावेळी पीव्हीआरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमिर बोलत होता. यावेळी तो म्हणाला, ''मी जर कुणाचे मन दुखावले असेल तर मला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटते. मला कुणाचेही मन दुखावयचे नसते आणि जर काही लोकांना चित्रपट पाहायचा नसेल तर त्यांचा मी आदर करेन. काय करु शकतो. पण मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी सिनेमा पाहावा कारण आम्ही खूप मेहनत त्यासाठी केली आहे. यात फक्त मी नाही, सिनेमा शेकडो लोकांच्या मेहनतीतून बनत असतो. तेव्हा मला वाटतं की लोकांना हा चित्रपट आवडेल.''

अलीकडे लाल सिंग चड्ढावर बहिष्कार घलण्यासाठीचा हॅशटॅग ( #BoycottLaalSinghCaddha ) वारंवार ट्विटर ट्रेंडमध्ये होत आहे. आमिरने पूर्वी केलेले भारतात असहिष्णुता वाढत असल्याबद्दलचे विधान पुन्हा खोदून काढून त्याला ट्रोल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीची करिनाची काही वादग्रस्त विधानेही ऑनलाइन होत आहेत.

आमिर खानच्या आगामी चित्रपटाबद्दल नेटिझन्सने संताप व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, जेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मे महिन्यात ट्रेलर लॉन्च केला तेव्हा हाच हॅशटॅग ट्रेंड करत होता. रिलीजपूर्वी त्याच्या चित्रपटाबद्दलचा द्वेष त्याला त्रास देत आहे का असे आमिरला विचारले असता सुपरस्टार म्हणाला की समाजाच्या एका वर्गामध्ये कसा गैरसमज आहे हे जाणून घेणे त्याला नक्कीच 'दुखावत' असल्याचे तो म्हणाला होता.

मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या आमिरने त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नये अशी विनंतीही त्याच्यावर नाराज असलेल्यांना यापूर्वी केली होती. द्वेष करणाऱ्यांना विनंती करत आमिर खान म्हणाला होता, "कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. कृपया माझा चित्रपट पहा."

आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओज निर्मित लाल सिंग चड्ढा चित्रपटामध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका, एम्समध्ये उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.