मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जी 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट आज भारतात आणि विदेशात १,०४५ स्क्रिन्सवर रिलीज होत आहे. यातील अर्धे स्क्रिन्स भारतात व अर्धे विदेशात असणार आहे. निर्मात्यांनी ही ही एक स्मार्ट खेळी केल्याचे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलंय.
-
‘MRS CHATTERJEE VS NORWAY’ SCREEN COUNT... Team #MrsChatterjeeVsNorway - starring #RaniMukerji - opt for a strategic release plan… Release #MCVN at 1,045 screens worldwide…
— taran adarsh (@taran_adarsh) March 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⭐️ #India: 535 screens [120 cities]
⭐️ #Overseas: 510 screens [43 countries]
Smart move by the makers. pic.twitter.com/dgkB2ZAyBj
">‘MRS CHATTERJEE VS NORWAY’ SCREEN COUNT... Team #MrsChatterjeeVsNorway - starring #RaniMukerji - opt for a strategic release plan… Release #MCVN at 1,045 screens worldwide…
— taran adarsh (@taran_adarsh) March 17, 2023
⭐️ #India: 535 screens [120 cities]
⭐️ #Overseas: 510 screens [43 countries]
Smart move by the makers. pic.twitter.com/dgkB2ZAyBj‘MRS CHATTERJEE VS NORWAY’ SCREEN COUNT... Team #MrsChatterjeeVsNorway - starring #RaniMukerji - opt for a strategic release plan… Release #MCVN at 1,045 screens worldwide…
— taran adarsh (@taran_adarsh) March 17, 2023
⭐️ #India: 535 screens [120 cities]
⭐️ #Overseas: 510 screens [43 countries]
Smart move by the makers. pic.twitter.com/dgkB2ZAyBj
मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे स्क्रिन काउंट - तरण आदर्श यांनी आज चित्रपटाचा स्क्रिन काउंट ट्विट केला आहे यात त्यांनी लिहिलंय, 'राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीसाठी जोरदार तयारी केली असून १,०४५ स्क्रिन्सवर हा चित्रपट जगभर रिलीज होत आहे. भारतात १२० शहरातील ५३५ स्क्रिन्स b परदेशात ४३ शहरात ५१० स्क्रिन्स. निर्मात्यांनी ही सुंदर खेळी केली,' असल्याचे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलंय.
चित्रपटाचे कथानक - 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटाचे दिग्दर्शन असिमा चिब्बर यांनी केले असून चित्रपटाचे समिक्षकांनी कौतुक केले आहे. नॉर्वे देशातील संगोपनाच्या कायद्यांविरुद्ध लढणाऱ्या आणि फसवेगिरी करणाऱ्यांच्या फाशात अडकलेल्या आईची ही कथा आहे. यात नॉर्वेमध्ये आपल्या पती आणि मुलाबाळांसह राहणाऱ्या आईचे वास्तव चित्रण केले आहे. अज्ञात चोरट्यांनी तिचे मुले पळवली आणि ही मुले शोधावी यासाठी या माऊलीने देशाच्या कायदेशीर व्यवस्थेविरुद्ध कसा लढा केला याची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. सागरिका आणि अनुरुप भट्टाचार्य या बंगाली जोडप्याच्या बाबतीत नॉर्वेमध्ये २०११ मध्ये ही कथा घडली होती.
राणी मुखर्जीसाठी यश महत्त्वाचे - ख्यातनाम बंगाली अभिनेता अनिर्बन भट्टाचार्यसोबत राणी मुखर्जी पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे. या चित्रपटात जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी १७ मार्चपासून हा चित्रपट भारतात आणि विदेशात रिलीज झाला आहे.राणी मुखर्जीसाठी या चित्रपटाचे यश खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - Roop Nagar Ke Cheetey : मराठी चित्रपट 'रूप नगर के चीते'ची मेलबोर्न फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड