ETV Bharat / entertainment

Dalip Tahil : हिट अँड रन प्रकरणात दलीप ताहिल यांना सुनावली शिक्षा ; जाणून घ्या प्रकरण... - न्यायालयानं शिक्षा सुनावली

Dalip Tahil : अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे. हिट अँड रन प्रकरणात दोषी आढल्यानं त्यांना तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

Dalip Tahil
दलीप ताहिल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 4:09 PM IST

Updated : Oct 22, 2023, 5:40 PM IST

Dalip Tahil : बॉलीवूडमधील 65 वर्षीय अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयानं पाच वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा सुनावली केली आहे. हे प्रकरण 2018 सालचे आहे, जेव्हा दलीप दारूच्या नशेत गाडी चालवताना आढळले होते. यादरम्यान त्यांनी एका ऑटोरिक्षाला आपल्या कारनं धडकले होते. यावेळी एक युवक आणि युवती देखील गंभीर जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयानं पुराव्याच्या आधारे दलीपला 2018 च्या हिट-अँड-रन प्रकरणात दोषी ठरवले आहे. पुराव्यात असे म्हटले गेले आहे की, अपघातादरम्यान दलीपनं त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांना तपासणीसाठी नकार दिला होता. त्यानंतर तरीही त्यांचे नमुने घेण्यात आले. याशिवाय डॉक्टरांच्या अहवालानुसार रक्ताच्या नमुन्यात दारू आढळून आली होती.

डॉक्टरांच्या अहवालावर निर्णय देण्यात आला : न्यायालयानं हा निकाल डॉक्टरांच्या अहवालावरून दिला आहे. या अहवालानुसार यावेळी दलीप ताहिलला नीट चालता देखील येत नव्हते. याशिवाय त्यांना निट बोलता देखील येत नव्हते. आता या प्रकरणात ताहिल यांना दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप ताहिल यांनी मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी दोन महिन्यांच्या शिक्षेबाबत बोलताना सांगितले की, 'मी दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला मी सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. मी मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून ऐकले आहे की ही निलंबित शिक्षा आहे, ही 2018 ची केस आहे आणि त्यावेळी झालेला अपघात हा एक किरकोळ अपघात होता, ज्यामध्ये एका महिलेला किरकोळ दुखापत झाली होती.

काय होते संपूर्ण प्रकरण : हे प्रकरण 2018 मधील आहे. या प्रकरणात दलीप ताहिलला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दलीप यांनी एका ऑटोला धडक दिली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दलीपनं ऑटोला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता.

वर्कफ्रंट : दलीप ताहिल यांनी 'बाजीगर', 'इश्क', 'सोल्जर', 'राजा', 'रा-वन', 'कहो ना प्यार है' यासारख्या अनेक चित्रपटामध्ये काम केले आहेत. याशिवाय त्यांनी 'बुनियाद' या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी ब्रिटिश टीव्ही मालिका 'बॉम्बे ब्लूज'मध्येही काम केले आहे.

हेही वाचा :

  1. Leo Box Office Collection Day 4: विजय 'थलपथी'चा 'लिओ' बॉक्स ऑफिसवर करत आहे जोरदार कमाई...
  2. Happy Birthday Parineeti Chopra: प्रियांका चोप्रासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकांरानी परिणीतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
  3. Anil Kapoor: मिस्टर इंडियाचा दुसरा भाग येणार? अनिल कपूरची पोस्ट झाली व्हायरल...

Last Updated : Oct 22, 2023, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.