ETV Bharat / entertainment

Mumbai Attack : 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर बनलेत अनेक चित्रपट, जाणून घ्या त्यातील काही निवडक चित्रपटांबद्दल

26 नोव्हेंबर देशाच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे, जो कधीही विसरता येणार नाही. 26/11 च्या या मुंबई हल्ल्यावर बॉलिवूडसोबतच दक्षिणेतही अनेक चित्रपट बनले आहेत. (films made on Mumbai attack).

26/11 Mumbai Attack
26/11 Mumbai Attack
author img

By

Published : Nov 26, 2022, 5:14 PM IST

मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. (26 11 Mumbai Attack) या हल्यात देशातील अनेक वीर शहीद झाले. (26/11 मुंबई अटॅक). ताज हॉटेल सोबतच दहशतवाद्यांनी स्टेशन, कॅफे आणि अगदी हॉस्पिटललाही लक्ष्य केले होते. या हत्याकांडात 174 लोकांचा मृत्यू आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. (films made on Mumbai attack). या सिनेमांतून हा काळा दिवस दाखवण्यात आला असून या हल्ल्याची व्यथा मांडण्यात आली आहे. जाणून घ्या या दहशतवादी हल्यांवर बनलेल्या काही चित्रपटांची संक्षिप्त माहिती..

मेजर: हा चित्रपट 2008 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले लष्करी अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. पटकथा लिहिण्याबरोबरच दक्षिणेतील अभिनेता आदिवी शेषने चित्रपटात मेजरची भूमिका साकारली होती. चित्रपटात सई मांजरेकर, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, रेवती आणि मुरली शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे कलेक्शन उत्तम होते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हॉटेल मुंबई : २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात ताज हॉटेल हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य होते. 'हॉटेल मुंबई' हा चित्रपट याच ताज हॉटेल हल्ल्यावर आधारित आहे. हॉटेलचे कर्मचारी लोकांचे प्राण कसे वाचवतात आणि हल्ल्याच्या वेळी हॉटेलमध्ये काय होते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अँथनी मारस यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.

द अटैक ऑफ 26/11ः मुंबई हल्ल्यावर आधारित या चित्रपटात १० दहशतवादी आणि अजमल कसाब यांची कथा सखोलपणे दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात कसाबची चौकशी आणि हल्ल्याची संपूर्ण कथा सिनेमाच्या पडद्यावर उत्तमरीत्या दाखवण्यात आली होती. नाना पाटेकर हे मुंबई पोलीस सहआयुक्तांच्या भूमिकेत आहेत.

ताज महल : मुंबई हल्ल्यावर आधारित या चित्रपटात एका 18 वर्षीय फ्रेंच मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. ही मुलगी हल्ल्यादरम्यान हॉटेलच्या खोलीत एकटीच होती.

फॅंटम : मुंबई हल्ल्यावर लिहिलेल्या 'मुंबई अॅव्हेंजर्स' या पुस्तकावर आधारित या चित्रपटात सैफ अली खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची कारवाई आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची कथा दाखवण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.