ETV Bharat / entertainment

Jawan Movie : शाहरुख खानने 'जवान' चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना दिली रिलीजची आठवण...

author img

By

Published : Aug 7, 2023, 5:40 PM IST

अभिनेता शाहरुख खानने त्याच्या 'जवान' या चित्रपटामधील एक पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत शाहरुखने 'जवान' चित्रपटाची तारीख चाहत्यांना आठवण करून दिला आहे. या पोस्टरमध्ये किंग खान त्याच्या टक्कल केलेल्या लूकमध्ये दिसत आहे.

Jawan Movie
जवान चित्रपट

मुंबई : शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. 'जवान' या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर चाहत्यांमध्ये आधीच चर्चेत आहेत. दरम्यान, शाहरुख खानने 'जवान'च्या नवीन पोस्टरद्वारे चाहत्यांसमोर एक नवा सस्पेन्स ठेवला आहे. शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ७ सप्टेंबर २०२३ रोजी झळकणार आहे. दरम्यान आता सोमवारी 'जवान' चित्रपटामधील नवीन पोस्टर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाबाबत एक वेगळीच क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

शाहरुख खानने पोस्टमध्ये काय म्हटले : शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर 'जवान'चे नवे पोस्टर रिलीज करत या चित्रपटाबाबत एक अपडेट दिले आहे की, 'चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त ३० दिवस उरले आहेत. मी चांगला आहे की वाईट हे फक्त ३० दिवसांत कळेल. तुम्ही तयार आहात का? 'जवान' ७ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात रिलीज होत आहे.' असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या मोठ्या प्रदर्शनाचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. तसेच, चित्रपटाच्या आत्तापर्यंत आलेल्या सर्व अपडेट्सनी चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे आणि प्रेक्षकांकडून खूप प्रेमही या चित्रपटाला मिळत आहे.

चित्रपटाची मजबूत स्टारकास्ट : 'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ ​​अ‍ॅटली यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान आणि ऍटली पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. दरम्यान, गौरी खान आणि शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याशिवाय गौरव वर्मा हे 'जवान' चित्रपटाचे सहनिर्माता आहे. 'जवान'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर साऊथची सुपरहिट अभिनेत्री नयनतारा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि दीपिका पदुकोण कॅमिओ करताना दिसेल. तसेच 'जवान' चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. Kushi Trailer Date OUT: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'खुशी' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर...
  2. Sushant Singh Rajput : सुशांत सिंहसारख्या दिसणाऱ्या डोमिन अयानला पाहून चाहते झाले भावूक; राखी सावंतने केली कमेंट
  3. Neha sharma and aisha sharma : नेहा शर्मा आणि आयशा शर्माचे आईस डिप चॅलेंज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.