हैदराबाद - नाटू नाटू गाण्याचा गायक राहुल सिपलीगुंजने 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात पॉप आयकॉन रिहानासोबत एक फॅनबॉय क्षण अनुभवला. ऑस्कर 2023 मध्ये काळ भैरवसोबत नाटू नाटू गाणे सादर करणाऱ्या राहुलने गायिका रिहानाची स्तुती केली आहे. गायक राहुल सिपलीगुंज रिहानाला त्यांच्या अवॉर्ड गालामध्ये थेट सादरीकरणानंतर भेटला होता. राहुलने सोशल मीडियावर रिहानासोबतच्या त्याच्या भेटीचे क्षण जपून ठेवले आहेत. जागतिक किर्ती असलेली रिहाना ही 'नम्र' आणि 'डाऊन-टू-अर्थ लेडी' असल्याबद्दल अनेक ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिकेची राहुलने प्रशंसा केली. पण आत्तापर्यंत, राहुल रिहानाच्या भेटीसाठी का गेला होता हे कुणालाही कळले नव्हते. ऑस्करमध्ये रिहानाने त्याच्याशी संभाषण केले याचा खुलासा आता झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राहुलने रिहानाला भेटल्याचे सांगितले. नाटू नाटू हे गाणे लाईव्ह सादर केल्यानंतर राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव हे आपल्या ग्रीन रुमकडे परतत असताना रिहानाला पाहून तिच्यासोबत फोटो काढण्यास उत्सुक होता. मात्र लाजून तो विचारु शकत नव्हता. पण रिहानाने पुढे येऊन राहुल आणि काळ भैरवचे कौतुक केले. ऑस्करमध्ये रिहाना सोबतचे संभाषण उघड करताना राहुल म्हणाला, 'ती म्हणाली, 'मित्रांनो, तुम्ही खरोखर चांगले प्रदर्शन केले आहे आणि नाटू नाटूसाठी ऑस्कर जिंकल्याबद्दल अभिनंदन.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विशेष म्हणजे नाटू नाटू हे गाणे ऑस्करच्या शर्यती अगोदर लेडी गागा, रिहाना आणि इतरांच्या गाण्यांना मागे टाकून गोल्डन ग्लोब्समध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाणे वर्टिकलमध्ये जिंकले होते. 80 व्या गोल्डन ग्लोबमधील रिहानाच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर बराच चर्चेचा विषय बनला होता. नेटिझन्सच्या एका वर्गाने असे गृहीत धरले की राम चरणची पत्नी उपासना कामिनेनीने रिहानाचे अभिनंदन करुनही तिने आरआरआर टीमकडे दुर्लक्ष केले होते. मात्र तिने आपल्या प्रियकरासोबत हॉलमधून बाहेर पडण्यापूर्वी ती आरआरआर टीमला भेटली होती व अभिनंदनही केले होते. ऑस्कर जिंकून भारतात परतलेल्या आरआरआर टीमचे हैदराबाद विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले होते.