हैदराबाद: पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान स्टारर द लिजेंड ऑफ मौला जट चित्रपट जगभरातील थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'द लिजेंड ऑफ मौला जट' हा पाक सिनेमाचा पहिला चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. अमेरिका, युरोप आणि आखाती देशांमध्येही या चित्रपटाची जादू चालली असून या देशांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरला आहे. भारतात या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच क्रेझ आहे. आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
काय आहे या चित्रपटाची कथा? - हा चित्रपट ४१ वर्षीय दिग्दर्शक बिलाल लाशारी यांनी दिग्दर्शित केला आहे. 'द लिजेंड ऑफ मौला जट' ची कथा मौला जट आणि गँग लीडर नूरी नट (हमजा अली अब्बासी) यांच्यातील वैरावर आधारित आहे. मौला जट हा पंजाबचा सर्वात भयंकर योद्धा आहे आणि तो नूरीचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. ही कथा त्याच्या कुटुंबाच्या सन्मानाची आणि न्यायाची आहे, ज्यामध्ये खूप भावना आणि नाटकही पाहायला मिळत आहे. शेवटी, हा वाद संपवून मौला जट सुधारतो.
'द लिजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय हमजा अली अब्बासी, हुमायमा मलिक, मिर्झा गौहर रशीद, फारिस शफी, अली अजमत, नय्यर एजाज, शफकत चीमा, राहिला आगा, जिया खान आणि सायमा बलोच आपापल्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा, डीओपी आणि संपादक बिलाल लशारी आहेत आणि चित्रपटाची निर्मिती अली मुर्तझा, बिलाल लशारी आणि अम्मारा हिकमत यांनी केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपट निर्माते बिलाल लाशारी चित्रपटाला जगभरातून मिळालेल्या प्रेमाने खूप खूश आहेत. तो म्हणाला होता, 'चित्रपटाला जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. 'द लिजेंड ऑफ मौला जट'ने पाकिस्तानमध्ये बनवलेला चित्रपट जगाच्या नकाशावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली याचा आम्हाला अभिमान आहे.
हा चित्रपट अनेक देशांमध्ये प्रदर्शित - 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट जगभरातील 25 देशांमध्ये 500 स्क्रीन्सवर गेला आणि पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने 50 कोटींहून अधिक कमाई केली होती. यूएस, यूके, यूएई आणि पाकिस्तानमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानचा सर्वात मोठा बजेट (100 कोटी) चित्रपट आहे.
'द लीजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटाला IMDb वर जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाला 10 पैकी 9.4 रेटिंग मिळाली आहे. समीक्षक या चित्रपटाचे जोरदार कौतुक करत आहेत.
भारतातही या चित्रपटाची क्रेझ आहे आणि त्यांना तो लवकरात लवकर पहायचा आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माता अनुराग कश्यपनेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अनुराग कश्यपने 21 डिसेंबर 2018 रोजी ट्विट केले होते. त्याने या ट्विटमध्ये 'द लीजेंड ऑफ द मौला जट'चा फर्स्ट लूक शेअर केला आणि 'मौला जट परत आला' असे कॅप्शनमध्ये लिहिले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शक्तिशाली पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' 23 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. 2019 पासून पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकारांवर भारतात बंदी आहे. यापार्श्वभूमीवर चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. तब्बल १० वर्षानंतर भारतात रिलीज होणारा हा पहिलाच पाकिस्तानी चित्रपट आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने हा चित्रपट हमराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - Look back 2022 : प्रेक्षक आणि समिक्षकांच्या पसंतीस उतरलेले 2022 चे सर्वोत्कृष्ट १० मराठी चित्रपट