ETV Bharat / entertainment

आंतरराष्ट्रीय चित्रपटात जॅकी श्रॉफ साकारणार 'स्लो जो'ची भूमिका - bollywood movie updates

अभिनेता जॅकी श्रॉफ 'स्लो जो' नावाच्या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. सिंगापूर-फ्रान्स-भारत या चित्रपटाची सह-निर्मिती करणार असून हा चित्रपट फ्रेंच, इंग्रजी आणि कोकणी भाषेत प्रदर्शित होणार आहे, असे वृत्त 'व्हेरायटी'ने दिले आहे.

जॅकी श्रॉफ 'स्लो जो'
जॅकी श्रॉफ 'स्लो जो'
author img

By

Published : May 27, 2022, 1:30 PM IST

कान्स - अभिनेता जॅकी श्रॉफ 'स्लो जो' नावाच्या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. सिंगापूर-फ्रान्स-भारत या चित्रपटाची सह-निर्मिती करणार असून हा चित्रपट फ्रेंच, इंग्रजी आणि कोकणी भाषेत प्रदर्शित होणार आहे, असे वृत्त 'व्हेरायटी'ने दिले आहे. हा बायोपिक चित्रपट असून दर्पण ग्लोबल (सिंगापूर) साठी याची निर्मिती श्रेयसी सेनगुप्ता करणार आहे. प्रोजेक्टची घोषणा कान्स मार्चे डू फिल्ममध्ये करण्यात आली.

बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ हा दिवंगत गोव्यातील संगीतकार, जोसेफ मॅन्युएल दा रोचा यांची भूमिका साकारणार आहे. त्यांना जो स्लो या नावाने ओळखले जात असे. मुंबईत जन्मलेल्या जोसेफ मॅन्युएल याला हेरॉईनचे व्यसन होते आणि तो ड्रग डीलरही होता. जोसेफ मॅन्युएल याला त्याच्या कुटुंबाने नाकारला होता. 2007 मध्ये गोव्याच्या सहलीवर आलेल्या फ्रेंच संगीतकार सेड्रिक डे ला चॅपेल यांना जो ( जोसेफ मॅन्युएल ) भेटला. तो एक कवी आणि संगीतकार देखील होता, त्याने डे ला चॅपेलसाठी गायले. फ्रेंच माणूस त्याच्या आवाजाने मोहित झाला आणि त्याने त्याची काही कॅपेला गाणी रेकॉर्ड केली.

फ्रान्समध्ये परतल्यानंतर डे ला चॅपेलने होरायझन म्युझिकचे संगीत निर्माता ऑलिव्हियर बोकॉन-गिबोड यांच्याकडे जोची गाणी वाजवली व त्यांची विक्रीही केली. गोव्याच्या प्रवासादरम्यान, डे ला चॅपेल आणि जो यांनी स्लो जो आणि द जिंजर अॅक्सिडेंट या संगीत टीमची स्थापना केली. रेनेस येथे सर्वात मोठ्या फ्रेंच संगीत महोत्सवांपैकी एक असलेल्या ट्रान्सम्युजिकलेसचे संचालक जीन-लुईस ब्रॉसार्ड यांच्यासाठी ग्रुपने गाणी वाजवली गेली. 'व्हेरायटी' नोट्सनुसार जो फ्रान्सला गेला आणि 2009 च्या ट्रान्सम्युझिकल्समध्ये या ग्रुपने सादरीकरण केले आणि हा शो खूप यशस्वी झाला.

2011 मध्ये, स्लो जो आणि द जिंजर अॅक्सिडेंटने त्यांचा पहिला अल्बम 'सनी साइड अप' रिलीज केला आणि अल्बमचे यश फ्रान्स, त्यानंतर स्पेन, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम आणि भारताच्या या दौऱ्या दरम्यान सेल आऊटमधून दिसून आले. 2014 मध्ये जो 71 वर्षांचा असताना, 'लॉस्ट फॉर लव्ह' हा दुसरा अल्बम प्रसिद्ध केला. 2016 च्या सुरूवातीस, ग्रुपने 250 हून कॉन्सर्ट सादर केल्या होत्या. जो यांना मे 2016 मध्ये हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते 73 वर्षांचे होते. 'लेट मी बी गॉन' हा ग्रुपचा तिसरा अल्बम फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज झाला.

हेही वाचा - हॉलिवूड अभिनेता रे लिओटा यांचे शूटिंगदरम्यान निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.