मुंबई - वार्षिक गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड शो हा आनंदाचा प्रसंग असला तरी, शोचा होस्ट जो कोयने गोल्डन ग्लोब्स 2024 मध्ये टेलर स्विफ्टच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विनोद केला त्यामुळे काही गोष्टींना विचित्र वळण मिळाले. माइल्स टेलरची पत्नी केलीघ स्पेरीच्या बाजूला बसलेली गायिका टेलर स्विफ्ट रागावलेली दिसली. स्विफ्टवर केलेल्या काही लाजिरवाण्या विनोदांनंतर तिची सर्वात चांगली मैत्रीण, सेलेना गोमेझ देखील कंटाळली आणि इम्प्रेस झाली नाही.
-
oof. I don’t think Taylor Swift liked Jo Koy’s joke about her…#GoldenGlobes pic.twitter.com/6Eonu42KJE
— Spencer Althouse (@SpencerAlthouse) January 8, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">oof. I don’t think Taylor Swift liked Jo Koy’s joke about her…#GoldenGlobes pic.twitter.com/6Eonu42KJE
— Spencer Althouse (@SpencerAlthouse) January 8, 2024oof. I don’t think Taylor Swift liked Jo Koy’s joke about her…#GoldenGlobes pic.twitter.com/6Eonu42KJE
— Spencer Althouse (@SpencerAlthouse) January 8, 2024
यावेळी होस्ट कॉमेडियन जो कोय म्हणाला, "मी शपथ घेतो, अजून बरच पुढे जायचं आहे. गोल्डन ग्लोब आणि NFL मध्ये मोठा फरक हा आहे की, गोल्डन ग्लोबवर, आमच्याकडे टेलर स्विफ्टचे खूप कमी कॅमेरा शॉट्स आहेत." या विनोदावर गायिका स्विफ्टचा हसण्याच्या मूडमध्ये नव्हती. जेव्हा कॅमेऱ्या तिच्यावर स्थिरावला तेव्हा तिने तिच्या ड्रिंकचा एक घोट घेतला.
आता व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका युजरने लिहिले: "आज रात्री त्याचे कोणतेही विनोद कोणालाही आवडले नाहीत." टेलर स्विफ्टच्या चाहत्यांना जो कोयची विनोद बुद्धी आटल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
होस्ट जो कोयबद्दल बोलायचे तर कॉमेडी सेंट्रल आणि नेटफ्लिक्सने कोयच्या पाच स्टँड-अप स्पेशल फनी इज फनी वर्ल्ड टूरची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये लॉस एंजेलिस फोरमच्या त्याच्या 2022 नेटफ्लिक्स स्पेशल लाईव्हचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कोयने 2022 च्या युनिव्हर्सल पिक्चर फिल्म इस्टर संडेमध्ये मुख्य भूमिका साकारली, जी त्याच्या स्टँड-अप कॉमेडी आणि वैयक्तिक अनुभवांनी प्रेरित होती. डिस्ने चित्रपट हॉन्टेड मॅन्शनमध्ये त्याचा सर्वात अलीकडील परफॉर्मन्स होता आणि त्याने नेटफ्लिक्सवर लिओ आणि मंकी किंगसाठीही त्यानं आवाज दिला आहे.
विजेत्यांबाबतीतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे मार्गोट रॉबी (बार्बी) वर मात करत एम्मा स्टोनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (संगीत किंवा विनोदी) पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ख्रिस्तोफर नोलनला मिळाला आणि सिलियन मर्फीने जे. रॉबर्ट ओपेनहायमरच्या 'ओपेनहाइमर'मधील भूमिकेसाठी गोल्डन ग्लोब मिळवला. फ्रेंच चित्रपट 'अॅनाटॉमी ऑफ अ फॉल'ने त्या संध्याकाळी सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर नॉन-इंग्रजी भाषेच्या श्रेणीत दुसरे स्थान पटकावले. ग्लोब्स सध्या पॅरामाउंट+ आणि CBS वर थेट टेलिव्हिजनवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहेत.
हेही वाचा -