मुंबई Golden Globe Awards : 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांची घोषणा झाली आहे. प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला 'ओपेनहायमर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर डी'अविन जॉय रँडॉल्फला 'द होल्डोव्हर्स' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
'बार्बी','ओपेनहायमर' चा दबदबा : यंदाच्या गोल्डन ग्लोबमध्ये 'बार्बी' आणि 'ओपेनहायमर' या चित्रपटांचा दबदबा दिसला. गोल्डन ग्लोबसाठी बार्बीला 9 तर ओपेनहायमरला 8 नामांकनं मिळाले होते. ओपेनहायमरला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर (ड्रामा) चा पुरस्कार मिळाला. तर चित्रपटाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि किलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 'बार्बी' चित्रपटाला सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस उपलब्धीसाठी पुरस्कार मिळाला. लिली ग्लॅडस्टोनला 'किलर ऑफ द फ्लॉवर मून' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
टीव्ही पुरस्कार : 'बीफ'नं लिमिटेड सीरीज, अँथॉलॉजी आणि टीव्ही मूव्ही श्रेणींमध्ये दोन पुरस्कार जिंकले. अली वोंग आणि स्टीव्हन यून यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. जेरेमी अॅलन व्हाईटनं सलग दुसऱ्या वर्षी 'द बेअर'साठी सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेता (संगीत/कॉमेडी) पुरस्कार जिंकला. सह-कलाकार अयो एडेबिरीला सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्रीचा (संगीत/विनोदी) पुरस्कार मिळाला.
गोल्डन ग्लोब विजेते :
- सर्वोत्कृष्ट मोशन फिल्म - ओपनहायमर
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - ख्रिस्तोफर नोलन (ओपेनहायमर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (ड्रामा) - सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ड्रामा) - लिली ग्लॅडस्टोन (किलर ऑफ द फ्लॉवर मून)
- सर्वोत्कृष्ट पटकथा (मोशन पिक्चर) - अॅनाटॉमी ऑफ अ फॉल - जस्टिन ट्राइट, आर्थर हरारी
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रॉबर्ट डाउनी ज्युनियर (ओपेनहायमर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - डेविन जॉय रँडॉल्फ (द होल्डओव्हर्स)
- सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपट - अॅनाटॉमी ऑफ अ फॉल (फ्रान्स)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - इमा स्टोन - (पुअर थिंग्ज)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (संगीत/कॉमेडी) - अयो अदेबिरी (द बियर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (संगीत/कॉमेडी) - जेरेमी अॅलन व्हाईट (द बिअर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लिमिटेड सीरीज, अँथॉलॉजी आणि टीव्ही चित्रपट) - अली वोंग (बीफ)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (लिमिटेड सीरीज, अँथॉलॉजी आणि टीव्ही चित्रपट) - स्टीव्हन यून (बीफ)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – एलिझाबेथ डेबिकी (द क्राउन)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मॅथ्यू मॅकफॅडियन (सक्सेशन)
- स्टँड अप कॉमेडीमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी - रिकी गेर्वाईस
हे वाचलंत का :